जिल्हा पानासाठी.... एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीर निवडणूक लावली *ए. डी. चौगले यांची पोलिसांत तक्रार : भोगावती शिक्षण मंडळाचे राजकारण
By Admin | Updated: May 12, 2014 21:35 IST2014-05-12T21:35:03+5:302014-05-12T21:35:03+5:30
कोल्हापूर : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीररीत्या संस्थेची निवडणूक लावली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा अगर सभा बोलावण्याचा कोणताही अधिकार नसताना निव्वळ कारखान्याच्या संचालकांना मदत करण्यासाठी संगनमताने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन ए. डी. चौगले यांनी करवीर पोलिसांकडे आज (सोमवार) केली.

जिल्हा पानासाठी.... एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीर निवडणूक लावली *ए. डी. चौगले यांची पोलिसांत तक्रार : भोगावती शिक्षण मंडळाचे राजकारण
क ल्हापूर : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव एस. एस. पाटील यांनी बेकायदेशीररीत्या संस्थेची निवडणूक लावली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा अगर सभा बोलावण्याचा कोणताही अधिकार नसताना निव्वळ कारखान्याच्या संचालकांना मदत करण्यासाठी संगनमताने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन ए. डी. चौगले यांनी करवीर पोलिसांकडे आज (सोमवार) केली. भोगावती शिक्षण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मंडळाच्या घटनेतील तरतुदीनुसार भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन हे शिक्षण मंडळाचे पदसिद्ध सदस्य, तर कार्यकारी संचालक हे प्रधान सचिव असतात. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाने एकत्रित येत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर कॉँग्रेसने ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याचे सांगत अलिप्त राहणे पसंत केले आहे. १० मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. परंतु, आज ए. डी. चौगले यांनी संस्थेचे प्रधान सचिव एस. एस. पाटील यांच्याविरोधात करवीर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संस्थेची २३ मार्च २०१४ ला विशेष सर्वसाधारण सभा होऊन त्यामध्ये २०१४ ते २०१९ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड होऊन या कार्यकारी मंडळ निवडीबाबतचा मुंबई विश्वस्थ कायद्याप्रमाणे उपधर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात द्यावा लागणारा बदल अर्जही संस्थेने दाखल केला आहे. निवडण्यात आलेले कार्यकारी मंडळ हे संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहत आहेत, पण कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा शिक्षण मंडळाचे प्रधान सचिव एस. एस. पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम लावला आहे. ही फसवणूक असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चौगले यांनी पोलिसांत केली आहे. कोट-शिक्षण मंडळाची मुदत संपल्यानंतर २७ एप्रिलला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेनेच हा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम बेकायदेशीर होता, तर ए. डी. चौगले यांनी न्यायालयातून स्थगिती का आणली नाही? सभासदांना अंधारात ठेवून संस्था हडप करण्याचा डाव चौगले यांचा होता. संस्थेचा प्रधान सचिव म्हणून न्यायालयाने आपणाला निवडणूक घेण्याचा अधिकार दिला, हे चौगले यांनी माहिती करून घ्यावे म्हणजे फसवणूक कोण करते, हे त्यांना समजेल.- एस. एस. पाटील (प्रधान सचिव, शिक्षण मंडळ)