जिल्हास्तरीय कला स्पर्धेत जयश्री माने व सौरभ काशीद प्रथम
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
(फोटो)१२१२२०१४-आयसीएच-०१इचलकरंजी : जिल्हा परिषद, समाजकल्याण (अपंग) विभाग, कोल्हापूर व वारणा चैतन्य मतिमंद मुलांची शाळा वारणानगर यांनी ५५ व्या जागतिक अपंग दिनानिमित्त विविध कला स्पर्धा घेतल्या.स्पर्धेमध्ये रोटरी वेल्फेअर ट्रस्ट, इचलकरंजी संचलित रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल, तिळवणी या विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थिनी जयश्री माने हिने भरतकाम व सौरभ काशीद याने वेस्ट ...
जिल्हास्तरीय कला स्पर्धेत जयश्री माने व सौरभ काशीद प्रथम
(फोटो)१२१२२०१४-आयसीएच-०१इचलकरंजी : जिल्हा परिषद, समाजकल्याण (अपंग) विभाग, कोल्हापूर व वारणा चैतन्य मतिमंद मुलांची शाळा वारणानगर यांनी ५५ व्या जागतिक अपंग दिनानिमित्त विविध कला स्पर्धा घेतल्या.स्पर्धेमध्ये रोटरी वेल्फेअर ट्रस्ट, इचलकरंजी संचलित रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल, तिळवणी या विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थिनी जयश्री माने हिने भरतकाम व सौरभ काशीद याने वेस्ट री युज या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच पुष्परचना स्पर्धेत प्रियांका कांबळे, जयश्री माने, तर वाचा उपचारतज्ज्ञ अमृता जाधव यांच्या पुष्परचनेस द्वितीय क्रमांक मिळाला. त्यांना कलाशिक्षिका रेखा जाधव व संजय काशीद यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल रमेश मर्दा, डी. एम. कस्तुरे, महेश दाते, आनंदा रणदिवे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)(फोटो ओळी)कला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसोबत कलाशिक्षक व संस्थेचे अध्यक्ष रमेश मर्दा, डी. एम. कस्तुरे, मुख्याध्यापक आनंदा रणदिवे उपस्थित होते.