जिल्हा दुष्काळाने होरपळतोय

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:16+5:302015-08-18T21:37:16+5:30

१७ लाख हेक्टर शेती उजाड

The district is flooded with drought | जिल्हा दुष्काळाने होरपळतोय

जिल्हा दुष्काळाने होरपळतोय

लाख हेक्टर शेती उजाड
जिल्ह्यात एकूण १४ तालुक्यांचा समावेश आहे़ या तालुक्यात १ हजार ५९९ गावे असून, एकूण शेतीखाली क्षेत्र १७़ ०२ लाख हेक्टर आहे़ खरीप व रब्बीची गावे पुढीलप्रमाणे-
खरीप हंगाम- ५८१ गावे, रब्बी हंगाम- १०१८ गावे
खरिपाचे क्षेत्र- ५़ २९ लाख हेक्टर, रब्बीचे- ८़०९ लाख हेक्टर
़़़़़
गतवर्षीही भीषण दुष्काळ
५१६ गावांतील खरीप वाया
२०१४ मध्ये खरिपाच्या ५८१ गावांपैकी ५१६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी होती़ त्यामुळे बाधित झालेल्या २ लाख ३६ हजार ६८० शेतकर्‍यांना सरकारी मदतीचे वाटप करण्यात आले होते़ मागीलवर्षी अवघ्या ६५ गावांतील खरीप हाती आले़ उर्वरित गावांतील खरीप वाया गेले़
तालुकानिहाय गावे
शेवगाव-३४, नेवासा-१३, राहाता-२४, संगमनेर-१३८, पाथर्डी-८०, कोपरगाव-१६, नगर-५, राहुरी-१७, पारनेर-३१, अकोले-१५८
़़़़
४०४ गावांतील रब्बीवर पाणी
रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू,करडी आणि कांदा यासारखी पिके घेणार्‍या गावांची संख्या १ हजार १८ आहे़ त्यापैकी २०१४ मध्ये ४०४ गावांतील रब्बी पिके वाया गेली होती़ तालुकानिहाय आकडेवारी अशी-
पाथर्डी-४१, नगर-८, शेवगाव-७९, पारनेर-६०, राहुरी-१५, राहाता-१९, कोपरगाव-६२, नेवासे-११४, श्रीरामपूर-६
़़़़
गतवर्षी ८०० हेक्टरला अवकाळीचा तडाखा
गेल्यावर्षी फेबु्रवारी ते डिसेंबर, या काळात तीनवेळा अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातले होते़ अवकाळीचा जिल्ह्यातील ८०१ हेक्टरला तडाखा बसला असून, त्यामुळे शेती पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे़
फेबु्रवारी ते मार्च २०१४ -पाथर्डी, राहाता, श्रीरामपूर,शेवगाव आणि कर्जत तालुक्यांत अवकाळी पाऊस,
नोव्हेंबर- पाथर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड आणि कोपरगावात अवकाळी
डिसेंबर- पारनेर तालुक्यातील १९२ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली
़़़़़़
असा होता गतवर्षी पाऊस
जिल्ह्यात मागील ऑगस्टपर्यंत सरासरी २७ टक्के पाऊस पडला होता़ यंदा तो ३१ टक्के आहे़ मात्र २२ मंडलांत अद्याप समाधानकारक पाऊस पडला नाही़ मागीलवर्षी कुठे किती टक्के पाऊस झाला़ त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे़
अकोले- ९१, संगमनेर-१५, कोपरगाव-२४, श्रीरामपूर-३४, राहुरी-२२, नेवासे-२१, राहाता-२३, नगर-२८, शेवगाव-२४, पाथर्डी-२६, पारनेर-१०, कर्जत-१९, श्रीगोंदा-१९, जामखेड-२४
़़़़





Web Title: The district is flooded with drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.