शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्?ाबाहेर चारा नेण्यास बंदी

By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST

जिल्हाधिकारी: 12 हजार हेक्टरांवर चार्‍याची लागवड

जिल्हाधिकारी: 12 हजार हेक्टरांवर चार्‍याची लागवड
सोलापूर: जिल्?ात सप्टेंबरअखेर चारा टंचाई जाणवणार नाही़ सध्या असलेला चारा जिल्?ाबाहेर जात आहे, त्यामुळे हा चारा बाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत़ जिल्हा नियोजन समितीमधून चारा बियाणे खरेदीसाठी 1 कोटी निधी ठेवला असून त्यातील 50 लाखांची निविदा काढण्यात आली आह़े तसेच केंद्राच्या विशेष कार्यक्रमातून 12 हजार हेक्टरावर चारा लागवड केली जाईल, 45 दिवसात हा चारा उपलब्ध होईल, अशी खात्री जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली़
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाईबाबत बुधवारी बैठक आयोजित केली होती़ यावेळी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पृथ्वीराज, अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, लाभक्षेत्र विभागाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, रोहयो उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आदी उपस्थित होत़े
मुंढे म्हणाले की, टंचाई परिस्थितीत पिण्याचे पाणी, जनावरांना चारा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आह़े या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात़ पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित करावेत़ सर्व प्रकल्पातील पाणी फक्त पिण्यासाठीच वापराव़े नदीपात्रामध्ये कोणत्याही मोटारी दिसणार नाहीत, याची दक्षता घ्यावी़
जिल्हा कृर्षी अधिकार्‍यांना दिलेल्या निधीतून व जिल्हा अधीक्षक कृषी यांना दिलेल्या निधीतून किती चारा निर्माण झाला याचा आढावा घेण्याच्या सूचना यावेळी दिल्या़ सन 2015-16 या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीमधून चारा बियाणे खरेदी करण्यासाठी 1 कोटीचा निधी ठेवण्यात आला होता़ त्यापैकी 50 लाखांची निविदा काढण्यात आली आह़े सध्या ज्या ठिकाणी चारा टंचाई आहे त्यानुसार तालुकानिहाय कारवाई करावी़ केंद्र शासनाकडून याबाबत आलेल्या निधीतून तातडीने कार्यवाही करा, अशा सूचना मुंढे यांनी यावेळी दिल्या़
जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
-जिल्?ात आवश्यकतेनुसार चारा छावणी सुरू करण्याचा विचार
-ज्या गावात पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी टँकर द्यावेत
-तहसीलदारांनी बुधवारी सविस्तर बैठक घेऊन तालुक्याचे नियोजन करावे
-कोणत्याही प्रकल्पातील पाणी पिण्याशिवाय सिंचनासाठी वापरू नये
-हायड्रोपोनिक्स चार्‍याचे प्रशिक्षण तालुकास्तरावर घ्यावे