शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 07:45 IST

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या

हरीश गुप्ता नवी दिल्ली : राजस्थानमध्येकाँग्रेस पक्षाला संकटाचा सामना करावा लागत असतानाच राज्य भाजपामधील असंतोषही समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्याशी संबंधित समस्येवर भाजपा नेतृत्वही झगडत आहे. 

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाचा पराभव झाल्यापासून त्या अधिक सक्रिय नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया यांना जानेवारी २०१९मध्ये विरोधी पक्षनेते आणि सतीश पुनिया यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. २०२०मध्ये सचिन पायलट यांनी २०हून अधिक आमदारांसह आपली ताकद दाखविली. या ऑपरेशन लोटसमध्येही वसुंधरा राजे यांचा सहभाग नव्हता. जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत हे वसुंधरा राजे यांची नव्हे तर, भाजप नेतृत्त्वाची निवड आहेत, हेही नंतर दिसून आले. 

भाजपाच्या चुकीच्या भूमिकेमुळे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आणि काँग्रेसचे काही आमदार सचिन पायलट यांच्या नियंत्रणातून बाहेर पडले. विधानसभा निवडणुकीला १५ महिने बाकी असताना भाजपा नेतृत्व आता स्वत:चे घर व्यवस्थित ठेवत आहे. २०० सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे ७१ आमदार आहेत आणि २०२३च्या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे भाजपा सर्व गटांना एकत्र आणण्यास उत्सुक आहे. 

केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा ?  अलिकडच्या काळात भाजपा नेतृत्व वसुंधरा राजे यांना महत्त्वाच्या कार्यक्रमात निमंत्रित करुन शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले असले तरीही त्या मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय राहिल्या आहेत.भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वसुंधरा राजे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केले जाऊ शकते. दुष्यंत सिंह हे चार वेळा लोकसभेचे खासदार झालेले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा