दिल्लीतून फुटली संवादाची कोंडी !
By Admin | Updated: September 20, 2014 01:59 IST2014-09-20T01:59:16+5:302014-09-20T01:59:16+5:30
‘युती ठेवायचीच’ ही रूपरेषा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान मोदी यांच्या दुपारी झालेल्या भेटीतून ठरली तर त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमधील संवादाची कोंडी अखेर दिल्लीतून फुटली.
दिल्लीतून फुटली संवादाची कोंडी !
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्तीनंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपानेते एकनाथ खडसे व सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेशी चर्चेची सुरूवात करण्यास सांगितले. ‘युती ठेवायचीच’ ही रूपरेषा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान मोदी यांच्या दुपारी झालेल्या भेटीतून ठरली तर त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमधील संवादाची कोंडी अखेर दिल्लीतून फुटली.
सेना-भाजपाच्या वादात मोदी या वादात मध्यस्तीकरतील असे मानले जात होते. पण भाजपाध्यक्ष अमित शहा स्वत: निवडणुकीचे प्रभारी ओमप्रकाश माथुर महाराष्ट्राच्या दौ:यावर होते. त्यामुळे तेच हा विषय निकाली काढतील असे वाटत होते. तथापि, शिवसेनेने ताठर भूमिका घेतल्याने चर्चेचा मार्ग निघत नव्हता.
सूत्रंनी सांगितले की, आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी युतीचा काडीमोड विरोधकांसाठी लाभदायी ठरू शकतो. तेव्हा दोन पाऊल मागे या, असे शहा यांना सांगितले. त्यामुळे शहा यांनी राज्यातील नेत्यांना सेनेसोबत चर्चा करण्याचे फर्मान सोडले.
पण तरीही दुपारी दोनर्पयत कोणताच निर्णय पक्षाकडून होत नव्हता. त्यातच मुंबईला पूवर्नियोजित दोन कार्यक्रमांसाठी निघालेले नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याबरोबर मुंबईला जाण्याचे रद्द केले. त्या्मुळे युती तुटण्याची चर्चा शिगेला पोचली. गडकरी खरोखरच आजारी आहेत का,याची चाचपणी करणारे शेकडो फोन कार्यालयात धडकू लागले. मुळात, परवा मुंबईतील भाजपाची बैठक आटोपून गडकरी दिल्लीत पोचल्यावर त्यांना सर्दी - पडशे झाले. आज सकाळी बील गेट्स त्यांच्या घरी आले तेव्हाही ते अस्वस्थच होते. त्यामुळे मुंबईतील कार्यक्रम रद्द करून ते विमानतळावरुनच घरी पोहोचले. त्यामुळे दुपारनंतरच्या घडामोडीत गडकरींचा सहभाग कुठच नव्हता.