होमिओपॅथी पुस्तकांचे प्रदर्शन (वाणिज्य वार्ता)
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30
अहमदनगर : पारशा खुंट येथील स्वास्तिक होमिओ फार्मातर्फे होमिओपॅथी औषधांची परिपूर्ण माहिती देणार्या पुस्तकांचे प्रदर्शन शनिवार व रविवारी भरविण्यात येणार आहे.

होमिओपॅथी पुस्तकांचे प्रदर्शन (वाणिज्य वार्ता)
अ मदनगर : पारशा खुंट येथील स्वास्तिक होमिओ फार्मातर्फे होमिओपॅथी औषधांची परिपूर्ण माहिती देणार्या पुस्तकांचे प्रदर्शन शनिवार व रविवारी भरविण्यात येणार आहे. स्वास्तिक फार्माची नवीन शाखा दिल्लीगेट येथील सुपेकर मेडिकल शेजारी सुरू होत आहे. या शाखेत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध आजार व उपचारांवर माहिती देणारी ५०० पुस्तके प्रदर्शनात उपलब्ध राहणार असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. पुष्पौषधींची पुस्तकेही उपलब्ध आहेत. खरेदीकर दहा टक्के सवलत राहणार असून वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थी व डॉक्टरांसाठी आवश्यक सर्व पुस्तके या प्रदर्शनात राहणार असल्याची माहिती दीपक दासवाणी यांनी दिली. (वा.प्र.).....................