शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

७ रुपये जास्त मिळाल्याने नोकरीवरून काढले; शिक्षेने सदसद्विवेकबुद्धीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 09:39 IST

काेर्ट म्हणाले, पुन्हा कामावर घ्या...

चेन्नई : अचानक केलेल्या तपासणीमध्ये बॅगेत केवळ ७ रुपये जास्त निघाल्याने तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाने (टीएनएसटीसी) आठ वर्षांपूर्वी एका कंडक्टरला कामावरून काढून टाकले होते. आता मद्रास उच्च न्यायालयाने टीएनएसटीसीला फटकारले असून एका आठवड्यात कंडक्टरला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्ट सुनावणीवेळी म्हणाले की, कंडक्टरला सुनावलेल्या शिक्षेने न्यायालयाच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का बसला. २०१५ चे हे प्रकरण आहे. तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळा (विल्लुपुरम विभाग) ने बसमध्ये तपासणी केली. यावेळी बस कंडक्टर अय्यानार यांच्या कलेक्शन बॅगमधून तिकिटानुसार ७ रुपये जास्त आढळून आले होते.

चुकीची शिक्षा...महामंडळाच्या या निर्णयाला अय्यानार यांनी वकील एस. एलमभारथी यांच्या मदतीने मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती पी. बी. बालाजी यांनी महामंडळाला फटकारले. ते म्हणाले की, ७ रुपये अधिक घेतल्याने महामंडळाचा महसूल बुडाला असे म्हणण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. अय्यानारला देण्यात आलेली शिक्षा ही गुन्ह्याच्या तुलनेत अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का बसतो.

कंडक्टर काय म्हणाला? अय्यानार यांचे वकील एलमभारथी यांनी महामंडळाचे आरोप फेटाळून लावले. बसमध्ये एक महिला चढली होती, तिला जवळच जायचं होतं. अय्यानारने तिला पाच रुपयांचे तिकीट दिले. प्रवासादरम्यान महिलेचे तिकीट हरवले आणि तपासणीदरम्यान भीतीमुळे तिने कंडक्टरवर तिकीट न दिल्याचा आरोप केला. त्याचवेळी कलेक्शन बॅगेत सापडलेले दोन रुपये त्यांना एका प्रवाशाला परत द्यायचे होते.

काय होते आरोप? महामंडळाने अय्यानार यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. तिकिटाचे पैसे घेऊनही त्यांनी एका महिला प्रवाशाला तिकीट दिले नाही. तपासादरम्यान त्याच्या कलेक्शन बॅगेत सात रुपयांपेक्षा जास्त रक्कम आढळून आली. महामंडळाचे नुकसान करण्याचे काम त्यांनी केले आहे. तो जबाबदार कर्मचारी नव्हता, असा आरोप करण्यात आला होता.

कोर्ट काय म्हणाले? दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, अय्यानारच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादावर आम्ही समाधानी आहोत. अय्यानार यांना आठवडाभरात पुन्हा कामावर घेण्यात यावे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEmployeeकर्मचारी