शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशातील 'हे' ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करा ; संरक्षण विभागाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 09:41 IST

सध्या पुण्यासहित देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती खूपच नाजूक आहे.

विक्रम मोरे- 

पुणे (लष्कर) : पुणे ,खडकी, देहूरोड सहित राज्यातील ७ व देशभरातील ५६  कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ११ तारखेपासून होईल. या आदेशाला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दुजोरा दिला आहे.

संरक्षण विभागाच्या प्रधान निर्देशकांनी याबाबतचे पत्र देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंटच्या मुख्यकार्यकरी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. हे सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड १० फेब्रुवारी २०१५ ला अस्तित्वात आले होते. १० फेब्रुवारी २०२९ला त्यांचा कार्यकाळ संपला. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यात ६ महिन्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याची तरतूद आहे, त्यामुळे  सहा -सहा महिन्यांचा दोन  मुदतवाढ मिळाल्या होत्या. ही मुदत येत्या १० तारखेला संपत असून बोर्ड बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने  आता अधिकृत पत्र रक्षा संपदा विभागाकडून प्राप्त झाल्याने येत्या ११ फेब्रुवारीपासून बोर्ड बरखास्त होणार आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यातील तरतुदीनुसार जेव्हा बोर्ड बरखास्त होतो तेव्हा पुढील निवडणूक जाहीर होईपर्यंत बोर्डाचा कारभार बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर व मुख्यकार्यकारी अधिकारी या द्विसदस्यीय समितीमार्फत चालतो किंवा बोर्डावर प्रशासक म्हणून लोकांचा प्रतिनिधी  म्हणून सुद्धा संरक्षण मंत्रालय नेमु शकते. अश्यावेळी अध्यक्ष , उपाध्यक्ष लोकप्रतिनिधी व मुख्यकार्यकारी अधिकारी अशा त्रिसदस्यीय समिती मार्फत बोर्डाचा कारभार चालतो.

सध्या पुण्यासहित देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती खूपच नाजूक असून लॉकडाऊन,करोना, व देशातील एकंदर वातावरण पाहता निवडणूक घेणे प्रशासनाला परवडणारे नसल्याने  द्विसदस्यीय किंवा लोकांतील प्रतिनिधींद्वारे त्रिसदस्यीय समिती स्थापन होण्याची दाट शक्यता आहे. लोकांचा प्रतिनिधी म्हणून गेल्या दोन तीन महिन्यापासून अनेक आजीमाजी नगरसेवकांनी ,जेष्ठ कार्यकर्त्यांनी आपले नाव उपाध्यक्ष म्हणून यावे यासाठी फिल्डिंग लावल्याचे समजते.

जेव्हा बोर्ड बरखास्त होते तेव्हा जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणजे उपाध्यक्ष निवडण्याची एक पद्धत आहे ज्यात इच्छुकांनी आपली नावे कॅन्टोन्मेंट प्रशासनाला अर्ज व प्रतिज्ञापत्र द्वारे काळवायची असतात ती नावे बोर्ड, दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाच्या प्रधान कार्यालयाला देतात व त्यातुनच जनतेचा प्रतिनिधी निवडला जातो...............संरक्षण मंत्रालयाचा आदेश आजच प्राप्त झाला आहे. त्यानुसार विद्यमान बोर्ड येत्या १० तारखेपर्यंत अस्तित्वात असेल.- अमितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड.

टॅग्स :Puneपुणेpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डIndian Armyभारतीय जवानcorona virusकोरोना वायरस बातम्या