शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दिशा रवीला माहीत होते टूलकिट बनविण्याचे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 02:42 IST

Disha Ravi : दिल्ली पोलिसांनी दिशाला अटक करून तिचे इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त केली. दिशाने तिचा डेटा डिलीट केला असून तो मिळविला जात आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : दिल्लीत २६ जानेवारील झालेल्या हिंसाचाराच्या तपासात टूलकिटची मुळे शोधताना दिल्ली पोलिसांच्या हाती रोज नवे दुवे लागत आहेत. पोलीस याप्रकरणी अटकेत असलेल्या दिशा रवीकडे विचारपूस करत आहेत. मंगळवारी दिशा व ग्रेटा थनबर्ग यांच्यातील चॅटिंग सार्वजनिक झाली. त्यातून हे समजले की, दिशाला हे माहीत होते की आपण जे करत आहोत त्याचे परिणाम काय होतील.चॅट अशावेळी केले की, जेव्हा ग्रेटाने चुकून दिशाच्या टूलकिटला आपल्या ट्विटर पोस्टसोबत जारी केले होते. चूक लक्षात आली तेव्हा ग्रेटाने दिशाला संदेश पाठवून त्याला दुरुस्त करण्यास सांगितले व म्हटले की, तिला यामुळे बऱ्याच अडचणी येतील. त्यानंतर तिला टूलकिट ट्विट न करण्याचा दिशाने सल्ला दिला. तसेच  वकिलांशी बोलण्यासही सांगितले. रवीने म्हटले की, त्यात आमची नावे लिहिली आहेत. त्यामुळे आम्हाला यूएपीएला तोंड द्यावे लागू शकते.दिल्ली पोलिसांनी दिशाला अटक करून तिचे इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त केली. दिशाने तिचा डेटा डिलीट केला असून तो मिळविला जात आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चॅटमध्ये दिशाने लिहिले की, ‘वस्तुस्थिती ही आहे की मला खूप खेद आहे, आम्ही सगळे घाबरलेलो आहोत. कारण प्रकरण बिघडत आहे. परंतु, आम्ही हे सुनिश्चित करू की, तुमचे नाव खराब होणार नाही. आम्हाला सर्व काही डिॲक्टिवेट करावे लागेल.’दिल्ली पोलीस सूत्रांनुसार दिशा जे टूलकिट तयार करण्यात सहभागी होती त्याची योजना कॅनडात पोएटिक जस्टिस नावाच्या संघटनेच्या एम. ओ धालिवालने बनविली होती. त्याने त्याच्या जवळच्या पुनितच्या माध्यमातून शंतनू आणि नीकिताकडून भारतात संपर्क केला होता. त्यांचा उद्देश २६ जानेवारील आपल्या योजनेनुसार ग्लोबल ‘डे ऑफ ॲक्शन’ करणे. त्या आधी आणि नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल स्ट्राईक करण्याची योजनाही तयार केली होती.टूलकिटबाबत ज्या शंतनू मुळूकचे नाव घेतले जात आहे तो महाराष्ट्रातील बीडचा रहिवासी आहे. तो शेतकरी आंदोलनाशी जोडलेला होता. पोलिसांचे म्हणणे असे की, शंतनू २० ते २७ जानेवारीदरम्यान टीकरी सीमेवर हजर होता. दिल्ली पोलिसांनी बीडमध्ये जाऊन त्याच्या घरी छापा घातला; परंतु, त्याचा पत्ता लागला नाही. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले गेले आहे. 

आयएसआयशी संबंध! या प्रकरणातील महत्त्वाची नीकिता जैबकही बेपत्ता आहे. पोलिसांनी तिच्याशी ११ फेब्रुवारीला बंगळुरूत संपर्क केला होता तेव्हा सायंकाळी भेट झाली होती. तिच्याशी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी विचारपूस करण्याचे ठरले होते. पण दुसऱ्या दिवशी पोलीस तिच्या घरी गेले तेव्हा ती फरार झाली होती. याप्रकरणी कॅनडात राहणाऱ्या अनिता लालचे नाव जोडले गेले आहे. ती वर्ल्ड शिख ऑर्गनायझेशनची सहसंस्थापकही आहे. पोलिसांना या प्रकरणाचे धागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी जोडले गेले असावेत, अशी शंका आहे.

टॅग्स :Disha Raviदिशा रवि