शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

‘अविश्वास’वर गुरुवारी चर्चा? विराेधकांना जाणवणार राहुल गांधी यांची अनुपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:43 IST

मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेत निवेदनाच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधी पक्षांना अखेर पंतप्रधान मोदींना संसदेत बोलाविण्याची संधी मिळाली आहे.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : एनडीए सरकारविरोधात काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मांडलेल्या ठरावावर गुरुवार, ३ ऑगस्टपासून चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडे अविश्वास प्रस्तावाला पराभूत करण्यासाठी ३५१चे संख्याबळ आहे. 

मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेत निवेदनाच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधी पक्षांना अखेर पंतप्रधान मोदींना संसदेत बोलाविण्याची संधी मिळाली आहे. गौरव गोगोई यांच्या प्रस्तावावर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ३ ऑगस्ट रोजी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस चालणाऱ्या या चर्चेला शुक्रवारी ४ ऑगस्टला उत्तर देऊ शकतात.  

या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत उपस्थित नसण्याची ही पहिलीच वेळ असेल. लोकसभेत केंद्र सरकारकडे असलेल्या मोठ्या बहुमतामुळे अविश्वास ठराव निष्फळ ठरेल, हे निश्चित आहे. मात्र, या प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधी पक्षांना सरकारविरोधात संताप व्यक्त करण्याची पुरेपूर संधी मिळणार आहे. काँग्रेससह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाही या काळात राहुल गांधी यांची उणीव भासेल. मागच्या वेळी त्यांच्या भाषणानंतर राहुल गांधी हे त्यांच्या जागेवरून उठले आणि पंतप्रधान मोदी बसतात त्या ठिकाणी आले व त्यांना भेटले. याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. केंद्र सरकार आपल्या संख्याबळाच्या संदर्भात विरोधकांना आश्चर्यचकित करण्याच्या मन:स्थितीत आहे. सूत्रांनी सांगितले की, सरकारला इंडिया आघाडीतील काही संसद सदस्यांची मते मिळू शकतात. यात नितीशकुमार यांच्या जेडीयूमधील काही खासदार सरकारच्या संपर्कात आहेत. 

...हा डाव विरोधकांना महागात पडेल -  अविश्वास प्रस्तावाचा हा डाव विरोधकांना चांगलाच महागात पडणार आहे. मणिपूरसोबतच पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगडमधील महिलांसोबत झालेल्या अमानुष घटनांवरही चर्चा होणार आहे. -  मोदींसाठी २०२४चा अजेंडा निश्चित करण्याची ही एक उत्तम संधी असेल. लोकसभेत भाजपचे संख्याबळ ३०१ आहे. त्यामुळे अध्यक्षांना भाजपला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. त्यामुळे विरोधी पक्षांना जास्त ऐकून घ्यावे लागेल,

नियमानुसार सत्ताधारी पक्षाला आधी बहुमत सिद्ध करणे बंधनकारक नाही. सर्वांना माहीत आहे की लोकसभेत सरकारकडे दोन तृतीयांश बहुमत आहे आणि संख्याबळ आमच्या बाजूने आहे.-पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री,  राज्यसभेतील सभागृह नेते

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस