आधी चर्चा अन् नंतरच डल्लेवाल उपचार घेणार, पंजाब सरकारचे कोर्टात निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:44 IST2025-01-01T06:43:12+5:302025-01-01T06:44:30+5:30

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ३५ दिवसांपासून उपाेषण करणारे शेतकरी नेते डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवण्यासंबंधी दिलेल्या आदेशाची पंजाब सरकारने अंमलबजावणी करण्याबाबत सुनावणी सर्वाेच्च न्यायालयाने आता २ जानेवारीला ठेवली आहे.

Discussion first and only then Dallewal will take treatment, Punjab government's statement in court | आधी चर्चा अन् नंतरच डल्लेवाल उपचार घेणार, पंजाब सरकारचे कोर्टात निवेदन

आधी चर्चा अन् नंतरच डल्लेवाल उपचार घेणार, पंजाब सरकारचे कोर्टात निवेदन

नवी दिल्ली : किमान हमीभावावर कायदेशीर हमीच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदत उपोषण करणारे शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांची प्रकृती खालावली असून, केंद्र सरकार या मागण्यांवर चर्चेसाठी तयार झाले तरच डल्लेवाल उपचार घेण्यास राजी होतील, असे पंजाब सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.  

सुनावणी लांबणीवर
- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ३५ दिवसांपासून उपाेषण करणारे शेतकरी नेते डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवण्यासंबंधी दिलेल्या आदेशाची पंजाब सरकारने अंमलबजावणी करण्याबाबत सुनावणी सर्वाेच्च न्यायालयाने आता २ जानेवारीला ठेवली आहे. 
- २० डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पंजाब सरकारने तीन दिवसांचा अवधी मागितला होता. 

आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा
पंजाब सरकारच्या वतीने न्यायालयात उपस्थित महाधिवक्ता गुरमिंदरसिंग यांनी न्यायालयात सांगितले की, याबाबत मध्यस्थी करणारे एक शिष्टमंडळ आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करीत आहे.
 

Web Title: Discussion first and only then Dallewal will take treatment, Punjab government's statement in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.