शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

बेकारी, महागाई, इंधन दरवाढीवर चर्चा करा, विरोधकांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 06:51 IST

Parliament Winter Session 2021: देशात वाढलेली बेकारी, महागाई, इंधन दरवाढ तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत केली.

नवी दिल्ली : देशात वाढलेली बेकारी, महागाई, इंधन दरवाढ तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत केली. पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकारक्षेत्र विस्तारण्यात आले आहे. त्यालाही विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे.

या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय व डेरेक ओब्रायन यांनी शेतमालाला किमान हमी भाव मिळण्यासाठी कायदे करावे, तसेच नफ्यातील सार्वजनिक उपक्रमांचे निर्गुंतवणुकीकरण या विषयांवर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. कोरोनाची स्थिती, महिला आरक्षणासह १० महत्त्वाचे मुद्दे तृणमूल काँग्रेसने सर्वपक्षीय बैठकीत मांडले. या बैठकीला ३३ पक्षांचे नेते उपस्थित होते.

सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षांपैकी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, अधीररंजन चौधरी, आनंद शर्मा, द्रमुकचे टी. आर. बालू, तिरुची शिवा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  शिवसेनेचे विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, बसपचे सतीश मिश्रा, बिजदचे प्रसन्ना आचार्य, नॅशनल कॉन्फरन्सचे डाॅ. फारूक अब्दुल्ला आदी नेते उपस्थित होते.

केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करणार असले तरी लवकरच हेच कायदे वेगळ्या स्वरूपात पुन्हा आणले जाणार असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे त्याबाबतही केंद्र सरकारने संसदेत स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी काही विरोधी पक्षांनी केली. किमान हमी भावासाठी कायदा करा, शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्यांना भरपाई द्या, अशा महत्त्वाच्या मागण्याही विरोधकांनी या बैठकीत केल्या. 

जनहिताच्या मुद्यांवर विरोधकांचे सहकार्यजनहिताच्या प्रश्नांवर विरोधक केंद्र सरकारला नक्कीच सहकार्य करतील, असे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा काय पवित्रा असावा यावर चर्चा करण्यासाठी खरगे यांनी अधिवेशन सुरू होण्याआधी उद्या, सोमवारी सकाळी विरोधी पक्षांची बैठक बोलाविली आहे.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार