शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

मॉनिटायझेशन स्कीमवरून RSSशी संबंधित संघटनांच्याच निशाण्यावर मोदी सरकार! करणार देशव्यापी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 12:42 IST

या प्रोग्रामशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित (RSS) संघटनांनी महागाई आणि तालिबानसोबत नवी दिल्लीच्या झालेल्या औपचारीक बैठकीवरूनही नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन प्रोग्रामवरून विरोधकांच्या विरोधाचा सामना करत असलेले केंद्रातील मोदी सरकार आता आपल्याच लोकांच्या निशाण्यावर आले आहे. या प्रोग्रामशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित (RSS) संघटनांनी महागाई आणि तालिबानसोबत नवी दिल्लीच्या झालेल्या औपचारीक बैठकीवरूनही नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर बीएमएसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने यापूर्वीच वाढत्या महागाईविरोधात एक ठरावही मंजूर केला होता आणि सरकारने याला आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणीही केली होती. (Discontent in rss affiliates over central government national monetisation programme)

देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनांपैकी एक असलेल्या बीएमएसचे सरचिटणीस विनयकुमार सिन्हा म्हणाले, 'कोरोनानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नोकऱ्यांमध्ये कपात आणि पगार कापल्यामुळे कामगारांना सर्वाधिक फटका बसला आहे आणि महागाईवर कोणतेही नियंत्रण नाही.

केंद्र सरकारच्या निर्णयांवर असमाधानी आणि नाखूष असलेल्या बीएमएसने आता 9 सप्टेंबर रोजी महागाईविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर, सरकारने वस्तूंच्या लेबलवर उत्पादन खर्च देण्याची तरतूदही करावी, जेनेकरून कंपन्या किती नफा कमवत आहेत, हेही लोकांच्या लक्षात येईल, अशी मागणीही बीएमएसने केली आहे.

मोदी फिर से... जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान

सिन्हा म्हणाले, "उदाहरणार्थ, फार्मा क्षेत्रातील कंपन्यांनी किती नफा मिळवावा, यावर कुणाचेच नियंत्रण नाही." अगदी या प्रमाणेच, सरकार एक राष्ट्र, एक करासंदर्भात बोलत असेल, तर ते पेट्रोलला जीएसटी अंतर्गत का आणत नाहीत? म्हणजे, रोज होणाऱ्या याच्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या किंमतीपासून सुटका मिळेल. यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनावरही परिणाम होणार नाही. तसेच, उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने इतर काही पर्यायांचाही विचार करावा, असेही सिन्हा यांनी म्हटले आहे.

बीएमएसने 2 नोव्हेंला नॅशनल मॉनिटायझेशन प्रोग्राम विरोधातही देशव्यापी निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर आरएसएसशी संबंधित आणखी एक संघटना स्वदेशी जागरण मंचनेही केंद्र सरकारच्या या कार्यक्रमावर टीका केली आहे. तसेच, सरकारी मालमत्ता खाजगी हातात जाण्याविरोधातही सरकारला इशारा दिला आहे.

गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेची (NMP) घोषणा केली. याअंतर्गत 2022 ते 2025 दरम्यान रेल्वे, रस्ता आणि वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या संपत्तीचे मुद्रिकरण केले जाईल. या योजनेअंतर्गत 15 रेल्वे स्टेडियम, 25 विमानतळ आणि 160 खाण प्रकल्प मॉनिटाइझ केले जातील. या सर्वांची मालकी सरकारकडेच राहील. आम्ही काहीही विकत नाही, काही काळानंतर ही सर्व संपत्ती परत होईल, असे अर्थमंत्री सितारमन यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघInflationमहागाईBJPभाजपा