शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाचळ नेत्यांच्या वक्तव्यांची भाजपा नेतृत्वाकडून गंभीर दखल, बजावली कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 13:09 IST

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाचा वाचाळ नेत्यांनी भाजपाच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाचा वाचाळ नेत्यांनी भाजपाच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्याने उदभवलेला वाद साध्वींच्या माफीनाम्यामुळे शांत होत असतानाच अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी साध्वीची री ओढत आगीत तेल ओतले आहे. त्यामुळे भाजपाची चांगलीच गोची झाली असून, या नेत्यांच्या वाचाळगिरीची गंभीर दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा पक्षाक्षी काहीही संबंध नाही, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. तसेच या नेत्यांच्या वक्तव्यांची दखल पक्षाच्या शिस्तपालन समितीने घेतली असून, त्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले की, साध्वी प्रज्ञा सिंह, अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी केलेली वक्तव्ये ही त्यांचे वैयक्तिक मत आहे. भाजपाचा त्यांच्याशी संबंध नाही. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागितली आहे. मात्र भाजपाने या वक्तव्यांची गंभीर दखल घेतली असून, त्यांची वक्तव्ये शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहेत. तसेच शिस्तपालन समितीने या नेत्यांना दहा दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. 

महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता, असे विधान  अभिनेता कमल हसन यांनी केले होते, त्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त होता, आहेत आणि राहील, अशा शब्दात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. मात्र वाद वाढल्यावर त्यांनी माफी मागितली होती. मात्र नंतर अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी साध्वींच्या वक्तव्याचा आधार घेट ट्विट केले होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक निकाल २०१९Amit Shahअमित शहाSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाAnantkumar Hegdeअनंतकुमार हेगडे