साडेतीनशे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रात्यक्षिक : नैसर्गिक आपत्तीदरम्यान घ्यावयाची काळजी
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:24+5:302015-02-08T00:19:24+5:30
शिरूर अनंतपाळ : नैसर्गिक आपत्तीमध्ये संयम बाळगून शांततेने तात्काळ निर्णय घेता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अभियान सुरू करण्यात आले आहे़ या अभियानांतर्गत शुक्रवारी तालुक्यातील रापका, उजेड, शिरूर अनंतपाळ येथील साडेतीनशे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले़

साडेतीनशे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रात्यक्षिक : नैसर्गिक आपत्तीदरम्यान घ्यावयाची काळजी
श रूर अनंतपाळ : नैसर्गिक आपत्तीमध्ये संयम बाळगून शांततेने तात्काळ निर्णय घेता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अभियान सुरू करण्यात आले आहे़ या अभियानांतर्गत शुक्रवारी तालुक्यातील रापका, उजेड, शिरूर अनंतपाळ येथील साडेतीनशे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले़आपत्ती व्यवस्थापन अभियानांतर्गत तहसीलदार वसंत पवार यांनी कृती कार्यक्रम आखला आहे़ कक्ष प्रमुख ओमप्रकाश चिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत धडे देण्यास सुरू केले आहे. शुक्रवारी तालुक्यातील रापका, उजेड, शिरूर अनंतपाळ येथे कार्यक्रम घेऊन भूकंप म्हणजे काय? आग आणि आगीचे प्रकार, दुष्काळ व त्याची कारणे, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत, १०८ नंबर म्हणजे काय? आदी बाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी संजय मेस्त्री यांनी आर.डी. राठोड, बी.एस. सदानंदे, एस.एस. आंबुलगेकर, ओ.एस. चिल्ले यांच्या मदतीने सविस्तर माहिती दिली. दरम्यान, अपघात झालेल्या व्यक्तीला तातडीची मदत मिळवून देण्यासाठी धावा... धावाच्या हाकेने थरार निर्माण झाला. परंतु, त्यास १०८ रुग्णवाहिकेची कशी मदत मिळू शकते, याची माहिती मिळाल्याने प्रात्यक्षिकांचा जिवंत देखावा सादर झाल्याने थरार प्रभावी ठरला.