मुंबई : संसदेत पारित केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याची विपरीत माहिती देऊन देशातील नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या खासदारांची मान्यता रद्द करण्याची सूचना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निवडणूक आयोगाला करावी, अशी मागणी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.सुधारित नागरिकत्व कायद्याला संसदेत प्रथम पाठिंबा देणाºया व नंतर आपले नागरिकत्व काढून घेतले जाईल, असे म्हणून देशातील नागरिकांच्या भावना भडकावणाºया खासदारांची मान्यता लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. संसदेत पारित कायद्याला विरोध म्हणजे लोकसभा व राज्यसभेत निवडून आल्यानंतर खासदारांनी घेतलेल्या शपथेला विरोध करण्यासारखे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे राज्यघटना धोक्यात आल्याच्या खोट्या अफवा खासदार पसरवित असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
‘त्या’ खासदारांची मान्यता रद्द करा; गोपाळ शेट्टींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 04:30 IST