'चीनसोबत असलेले मतभेद चर्चेतून नक्की दूर होतील'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:25 IST2020-06-14T03:24:20+5:302020-06-14T03:25:10+5:30
लष्करप्रमुखांना विश्वास; परिस्थिती पूर्ण नियंत्रणात

'चीनसोबत असलेले मतभेद चर्चेतून नक्की दूर होतील'
नवी दिल्ली : चीनच्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शनिवारी दिली व द्विपक्षीय चर्चेतून दोन्ही देशांमधील मतभेद नक्की दूर होतील, असा विश्वास व्यक्त केला.
लष्करप्रमुख नरवणे म्हणाले की, परिस्थिती पूर्णपणे ओटोक्यात आहे, अशी मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो. दोन्ही देशांमध्ये सैन्यांच्या स्थानिक कमांडरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरही चर्चेच्या अनेक फेºया झाल्या आहेत. परिणामी, दौन्ही बाजूंच्या सैन्यांनी बरीच माघार घेतली आहे. चर्चा अशीच पुढे सुरूठेवली, तर उभय देशांमधील सर्व मतभेद नक्की दूर होऊ शकतील, अशी आशा वाटते.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी चीनच्या सीमेवरील पूर्व लडाखखेरीज अरुणाचल प्रदेश, सिक्कीम व उत्तराखंडला लागून असलेल्या भागांतील भारतीय लष्कराच्या सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी पूर्वेकडील लडाख सीमेवरील एकूण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. यावेळी सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भादुरिया व नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग हजर होते.