शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Dis’Qualified MP... खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये केला बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 11:55 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल केले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल केले आहेत. आता राहुल गांधी यांनी आपल्या बायोमध्ये 'डिस्क्वालिफाईड एमपी'चा विशेष उल्लेख केला आहे. खरं तर, राहुल गांधींना त्यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल दोषी ठरवून खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या बायोमध्ये डिसक्वालिफाईड एमपी असं लिहिले आहे.

मोदी आडनाव प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शुक्रवारी सभापती ओम बिर्ला यांनी त्यांनी खासदारकी रद्द केली. सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं. दरम्यान, न्यायालयानं राहुल गांधींची तुरुंगवासाची शिक्षा एका महिन्यासाठी स्थगित केली. मात्र तरीही त्यांच्याकडे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे.

राहुल गांधींनी साधला निशाणा मला संसदेतून आजीवन अपात्र ठरविले किंवा तुरुंगवास झाला तरीही देशातील लोकशाहीचे रक्षण करत राहू, अशा शब्दात आक्रमक झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. घाबरलेल्या सरकारने त्यांना अपात्र ठरवून विरोधकांकडे मोठे शस्त्र दिल्याचा दावा त्यांनी केला.  

अदानी मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील त्यांच्या पुढच्या भाषणाला घाबरले म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हा संपूर्ण खेळ या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा होता. कारण, सरकारला या प्रकरणावरून भीती वाटत होती, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाTwitterट्विटर