बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच, जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, यावेळी बिहारची जनता लालू यादव किंवा प्रशांत किशोर यांच्यासाठी नव्हे, तर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि बिहारमध्ये बदल गडवून आणण्यासाठी मतदान करेल. येत्या 10 वर्षांत बिहार देशातील 10 अग्रणी राज्यांपैकी एक बनेल, असे स्वप्न आपण बघतो, ही त्याची सुरवात असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
किशोर म्हणाले, बिहारमध्ये खरी लढत तीन आघाड्यांमध्ये असेल. जनता एनडीए, महागठबंधन आणि जन सुराजच्या उमेदवारांसंदर्भात विचारत आहे. विशेषत: जन सुराजच्या उमेदवारांसंदर्भात अधिक उत्सुकता आहे. आपल्या मते, 90-95% मते या तिन्ही आघाड्यांमध्येच विभागले जातील. बाकिच्यांना काही अर्थन नाही. जनतेने बदलाचा निर्णय घेतला असून, एनडीए आणि 15 वर्षांच्या जंगलराजच्या पर्यायापेक्षा जन सुराजच्या नव्या व्यवस्थेला पसंती देण्याचा विचार जनता करत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
किशोर पुढे म्हणाले, निवडणूक तारखांच्या घोषणेनंतर आपण तणावमुक्त झालो आहोत. त्यांनी स्वत:ची तुलना अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याशी केली, ज्याला परीक्षेची भीती नासते. याच बरोबर, दोन टप्प्यांत निवडणूक घेण्याचा निर्णय योग्य असल्याचेही म्हटले आहे.
जन सुराजचा प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे किशोर यांनी सांगितले. आता जनतेने विचार करून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जय-विजय हा जन सुराजचा नव्हे, तर बिहारच्या जनतेच्या विचारसरणीचा असेल, असेही किशोर म्हाणाले.
महत्वाचे म्हणजे, 9 ऑक्टोबरला जन सुराज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल, ज्यात प्रशांत किशोर यांचे नाव असण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होईल, तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.
Web Summary : Prashant Kishor says Bihar's election is for education, jobs, and change. He envisions a three-way contest: NDA, MGB, and Jan Suraaj. He asserts Jan Suraaj offers a new option, with the first candidate list on October 9th. Results will be out November 14th.
Web Summary : प्रशांत किशोर का कहना है कि बिहार चुनाव शिक्षा, रोजगार और बदलाव के लिए है। उन्होंने एनडीए, एमजीवी और जन सुराज के बीच त्रिकोणीय मुकाबले की कल्पना की। उनका दावा है कि जन सुराज एक नया विकल्प प्रदान करता है, पहली उम्मीदवार सूची 9 अक्टूबर को। परिणाम 14 नवंबर को आएंगे।