शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

''50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार; पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार''

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 09:46 IST

50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.

ठळक मुद्दे50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणारगरज पडल्यास त्यांना देशाबाहेरही हाकलून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.सर्वात आधी त्यांचं नाव मतदारयादीतून काढून टाकण्यात येणार आहे.

नवी दिल्लीः  50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. गरज पडल्यास त्यांना देशाबाहेरही हाकलून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 24 परगना जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. सर्वात आधी त्यांचं नाव मतदारयादीतून काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर ममतादीदींना मतांचं ध्रुवीकरण करता येणार नाही. एकदा असं झाल्यास ममतादीदींची मतं आपोआपच कमी होतील आणि येत्या निवडणुकीत आम्ही 200 जागा जिंकू, असा विश्वास घोष यांनी व्यक्त केला आहे. ममतादीदींच्या पक्षाला 50 जागासुद्धा जिंकता येणार नाहीत.

तत्पूर्वी घोष यांनी 12 जानेवारीलासुद्धा असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांना भाजपाशासित राज्य उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात गोळ्या घातल्या पाहिजेत. राज्यात एक कोटी घुसखोर आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हिंसक प्रदर्शन करत 500 ते 600 कोटी रुपयांचं सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं आहे. ती काय त्यांच्या वडिलांची संपत्ती आहे काय?, ते सरकारच्या संपत्तीला कशा प्रकारे नुकसान पोहोचवू शकतात. जी करदात्यांच्या पैशातून तयार झाली आहे. उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक सरकारनं अशा राष्ट्रविरोधी तत्त्वांवर गोळीबार करून चालवून योग्य काम केलं आहे. आमचंच खातात, इथेच राहतात आणि इथल्याच सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करतात. त्यांच्या या विधानापासून भाजपानं हात झटकले होते. दिलीप घोष जे काही बोलले आहेत, त्याचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांचे विचार आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल