शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिग्विजय सिंह यांना साधू-संतांचा पाठिंबा, भोपाळमध्ये विजयासाठी केला यज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 05:52 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवल्याने आता अनेक साधू-संत-महन्त आता दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. कम्प्युटर बाबांना हाताशी धरून काँग्रेसने ही रणनीती आखली आहे.

भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवल्याने आता अनेक साधू-संत-महन्त आता दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. कम्प्युटर बाबांना हाताशी धरून काँग्रेसने ही रणनीती आखली आहे.बेगुसरायमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कन्हय्याकुमार यांच्यासाठी प्रचार करणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांनीही दिग्विजय सिंह यांचा प्रचार सुरू केला आहे. स्वत: कन्हय्या कुमार हेही दिग्विजय यांच्या प्रचारासाठी दोन सभा घेणार आहेत.कम्प्युटर बाबांनी देशभरातील हजारो साधूंना भोपाळमध्ये आणले असून, ते सध्या दिग्विजय सिंह यांचा प्रचार करताना दिसत आहेत. कम्प्युटर बाबा म्हणाले की, गेली पाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. पण त्यांनी या काळात अयोध्येत राम मंदिर उभारले नाही. त्यामुळे राम मंदिर नाही, तर मोदी पण नाही' अशी आमची घोषणा आहे. स्वत: दिग्विजय सिंह यांनी कम्प्युटर बाबांसोबत यज्ञामध्ये भागही घेतला. या यज्ञासाठी हजारो साधू भोपाळमध्ये आले होते.दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ हे सात ते आठ हजार साधू भोपाळमध्ये मिरवणूक काढणार असून, त्यासाठी कम्प्युटर बाबांनीच पुढाकार घेतला आहे. भाजपच्या प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देऊ न भाजपने हिंदूंची मते मिळवण्याचा प्रयत्न चालवला असताना काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्यामागेही साधू-संत उभे राहिले आहेत. (वृत्तसंस्था)...तर समाधी घेऊपंचायती श्रीनिरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले की, अनेक जण धर्माच्या नावावर फूट पाडत आहेत. सनातन धर्मात फूट पाडली जात आहे. त्यामुळेच आम्ही सारे जण दिग्विजय सिंह यांच्यामागे ठामपणे उभे आहोत. निवडणुकीत दिग्विजय सिंह विजयी न झाल्यास आपण समाधी घेऊ, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहbhopal-pcभोपाळcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019