दिगंबर भोगावडे भूमि अभिलेख उपअधीक्षकपदी
By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:32+5:302015-04-15T00:03:32+5:30
गोलेगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत भूमी अभिलेख उपअधीक्षकपदी गोलेगाव, ता. शिरूर येथील शेतकरी कुटुंबातील दिगंबर वाल्मीक भोगावडे यांची नुकतीच निवड झाली. ते गुणवत्ता यादीत आले आहेत. दिगंबर भोगावडे यांचे प्राथमिक शिक्षण गोलेगावच्या जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशाला विद्यालयामध्ये झाले आहे. तसेच कृषी पदवी व पदव्युत्तर कृषीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी झाले. यापूर्वी त्यांची पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायकपदी निवड झालेली होती. सध्या दिगंबर भोगावडे अन्न नागरी पुरवठा विभागात महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई याठिकाणी सहायकपदी कार्यरत आहेत. दिगंबर यांचे वडील वाल्मीक भोगावडे भारतीय सैन्यातील माजी सैनिक आहेत. पुणे जिल्हा बँक निर्वी येथील शाखेचे अधिकारी शरद भोगा

दिगंबर भोगावडे भूमि अभिलेख उपअधीक्षकपदी
ग लेगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत भूमी अभिलेख उपअधीक्षकपदी गोलेगाव, ता. शिरूर येथील शेतकरी कुटुंबातील दिगंबर वाल्मीक भोगावडे यांची नुकतीच निवड झाली. ते गुणवत्ता यादीत आले आहेत. दिगंबर भोगावडे यांचे प्राथमिक शिक्षण गोलेगावच्या जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशाला विद्यालयामध्ये झाले आहे. तसेच कृषी पदवी व पदव्युत्तर कृषीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी झाले. यापूर्वी त्यांची पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायकपदी निवड झालेली होती. सध्या दिगंबर भोगावडे अन्न नागरी पुरवठा विभागात महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई याठिकाणी सहायकपदी कार्यरत आहेत. दिगंबर यांचे वडील वाल्मीक भोगावडे भारतीय सैन्यातील माजी सैनिक आहेत. पुणे जिल्हा बँक निर्वी येथील शाखेचे अधिकारी शरद भोगावडे हे चुलतबंधू आहेत. नियमित अभ्यास व वाचन, सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडविणे यामुळे यश मिळाले. तसेच सर्वांची भरपूर मदत व मार्गदर्शन लाभले. भविष्यात पदाच्या माध्यमातून जनसेवेस प्राधान्य असेल. पुन्हा परीक्षेत संधी घेऊन तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारणार आहे, अशी माहिती दिगंबर भोगावडे यांनी दिली.फोटो ओळ : दिगंबर भोगावडे यांचा फोटो०००००