शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सलाम! प्रबळ इच्छाशक्तीनं अपंगत्वावर मात; झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयवर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 7:47 PM

दिव्यांग तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई: अ‍ॅप्समुळे खाद्यपदार्थ ऑर्डर करणं अगदी सोपं झालं आहे. मोबाईलवरुन खाद्यपदार्थ मागवताच अवघ्या काही मिनिटांमध्ये ते घरपोच मिळतात. त्यामुळे अनेकांसाठी हे फायदेशीर ठरतं. यामध्ये घरपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवणारे डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्ह्स महत्त्वाची भूमिका बजावतात. वाहतूक कोंडीतून वाट काढत डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्ह्स खाद्यपदार्थ अगदी ग्राहकाच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवतात. गेल्या वर्षी झोमॅटोच्या एका डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्हचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये झोमॅटोचा डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्ह ग्राहकापर्यंत पोहोचवायचा खाद्यपदार्थ खाताना दिसत होता. यावरुन झोमॅटोवर टीकेची झोड उठली. सोशल मीडियानं झोमॅटोचा जोरदार समाचार घेतला. यानंतर झोमॅटोच्या एका डिलेव्हरी बॉयची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुनही डिलेव्हरी बॉयचं काम करावं लागत असल्याबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केलं होतं. यानंतर आता झोमॅटो पुन्हा एकदा डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्हमुळे चर्चेत आला आहे. या डिलेव्हरी बॉयनं अनेकांना प्रेरणा दिली आहे. या डिलेव्हरी बॉयचं नाव रामू आहे. दिव्यांग असलेला रामू तीन पायांची सायकल घेऊन खाद्यपदार्थ ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचतो. हनी गोयल नावाच्या एका ट्विटर यूजरनं रामूचा व्हिडीओ शेअर केला. तीन पायांची सायकल चालवत ग्राहकांच्या दारात पोहोचणारा रामू या व्हिडीओत दिसत आहे. गोयल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी रामू यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यानंतर झोमॅटोनं सर्वांचे आभार मानले. 'हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आभार. आम्हाला आमच्या डिलेव्हरी पार्टनरचा अभिमान आहे. अनेक अडचणींवर मात करत ते ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवतात,' अशा शब्दांमध्ये झोमॅटोनं रामू यांचं कौतुक केलं.