Differently Abled Kerala Artist Wins Pinarayi Vijayan's Heart After Donating to Relief Fund | दिव्यांग कलाकाराचा मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी, सोशल मीडियात व्हायरल

दिव्यांग कलाकाराचा मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी, सोशल मीडियात व्हायरल

नवी दिल्ली : केरळमध्ये पायाने पेंटिंग काढणारा कलाकार प्रणव याने गेल्या काही दिवसांपूर्वी रिअॅलिटी टेलिव्हीजन शो जिंकला. त्यानंतर प्रणवने राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची भेट घेतली. या भेटीत प्रणवने रिअॅलिटी टेलिव्हीजन शोमध्ये मिळालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सढळ हस्ते दान केली. दरम्यान, प्रणव आणि पिनाराई विजयन यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून प्रणव याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. 

प्रणवचे दोन हात नाही आहेत. तो आपल्या आई-वडिलांसोबत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आला होता. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने प्रणव आणि पिनाराई विजयन यांच्या भेटीदरम्यानचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहे. तसेच, पिनाराई विजयन यांनीही आपल्या फेसबुक आणि ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, प्रणवने पिनाराई विजयन यांच्यांसोबत काढलेले सेल्फीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. तसेच, नेटिझन्सकडून प्रणवचे कौतुक करण्यात येत आहे. फेसबुकवरील पोस्टनुसार, चित्तूर येथील पलक्कडमध्ये सरकारी कॉलेजमध्ये बी.कॉमची डिग्री पूर्ण केल्यानंतर प्रणवने सध्या पीएससीचे कोचिंग क्लासेस सुरू आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Differently Abled Kerala Artist Wins Pinarayi Vijayan's Heart After Donating to Relief Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.