तंबाखू प्रतिबंधक जाहिरातींवर वेगवेगळे मतप्रवाह
By Admin | Updated: June 30, 2014 00:34 IST2014-06-30T00:34:32+5:302014-06-30T00:34:32+5:30
पडद्यावर दाखवण्यात येणा:या 3क् सेकंदाच्या तंबाखूविरोधी जाहिराती खरोखरचं लोकांवर प्रभाव पाडतात का, याबाबत सिने जगतात वेगवेगळे मतप्रवाह आहेत़

तंबाखू प्रतिबंधक जाहिरातींवर वेगवेगळे मतप्रवाह
>नवी दिल्ली : गत दोन वर्षापासून चित्रपट सुरू होण्यापूर्वी चित्रपटगृहांच्या पडद्यावर दाखवण्यात येणा:या 3क् सेकंदाच्या तंबाखूविरोधी जाहिराती खरोखरचं लोकांवर प्रभाव पाडतात का, याबाबत सिने जगतात वेगवेगळे मतप्रवाह आहेत़
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रियदर्शन अशा जाहिरातींचा परखडपणो विरोध करतात़ अशा जाहिरातींनी धूम्रपान करणा:यांचे काहीही भले होणार नाही़ यामुळे नव्या पिढीला धूम्रपान न करण्याची प्रेरणा कदाचित मिळेलही; पण धूम्रपानाला सरावलेल्या लोकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही़ खरा परिणाम साधायचा तर सिगारेटची विक्री बंद करायला हवी, असे ते म्हणतात़
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रलय तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाने ‘वर्ल्ड लंग फाऊंडेशन’ आणि भारताच्या सहकार्याने 2क्12-13 मध्ये तंबाखूविरोधी जाहिरातींची सुरुवात केली होती़ ‘वर्ल्ड लंग फाऊंडेशन’ने चित्रपटांपूर्वी दाखविण्यासाठी ‘स्पंज’आणि ‘मुकेश’ या दोन जाहिराती तयार केल्या होत्या़ या दोन्ही जाहिराती 2 ऑक्टोबर 2क्13 र्पयत चित्रपटगृहात दाखविण्यात आल्या़ यानंतर ‘चाईल्ड’ आणि ‘धुआं’ या दोन नव्या जाहिराती आल्या़ या सर्व जाहिरातींमध्ये तंबाखू सेवनाचे अनेक दुष्परिणाम दाखवत, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ न सेवन करण्याचे आवाहन केले जात़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
4एक अन्य राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपट दिग्दर्शक अंजली मेनन यांनी या जाहिरातींच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली आह़े या तंबाखूविरोधी जाहिरातींचा दर्जा अतिशय खराब आहे आणि त्याचमुळे त्या निष्प्रभावी ठरतात़