शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 09:44 IST

काल अमेरिकेने इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ले केले. यामुळे आता पुन्हा एकदा इस्त्रायल आणि इराणमध्ये संघर्ष वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. या वादात आता अमेरिकेने उडी घतली आहे. रविवारी पहाटे अमेरिकेने इराणच्या तीन अणु केंद्रांवर हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेने हे हल्ले करण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केल्याच्या दावा करण्यात आला आहे. पण, भारताने हे दावे फेटाळून लावले आहेत.

अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केल्याचा काही सोशल मीडिया हँडलचा दावा भारताने रविवारी "खोटा" असल्याचे म्हणत फेटाळून लावला.

"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला

अमेरिकेने इराणच्या तीन अणु ठिकाणांवर बॉम्बहल्ला केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने प्रत्युत्तर दिल्यास आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला.

अमेरिकेने भारताच्या हवाई क्षेत्राचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याचा सरकारकडून सांगण्यात आले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी असा दावा केला आहे की अमेरिकेने ऑपरेशन 'मिडनाईट हॅमर' दरम्यान इराणविरुद्ध हल्ल्यांसाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला होता. हा दावा खोटा आहे."

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो च्या फॅक्ट चेक युनिटने म्हटले आहे की, "ऑपरेशन मिडनाईट हॅमर दरम्यान अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला नव्हता."

अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर'

अमेरिकेने रविवारी (२२ जून २०२५) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यानंतर, इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान, ज्या कारवाईअंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला, त्या कारवाईला मिडनाईट हॅमर, असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.

अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर'! 

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आम्ही इराणी अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केला. मिडनाईट हॅमर ऑपरेशनअंतर्गत नागरिकांना अथवा इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले नाही." याच बरोबर, "इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या प्रत्युत्तराचा विचार केला, तर त्याला आणखी कठोर उत्तर दिले जाईल," असा इशाराही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाIndiaभारत