शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कैलास-मानसरोवर यात्रेवेळी राहुल गांधींनी नॉन व्हेज खाल्लं?... वाचा हॉटेल मालकाचं म्हणणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 10:02 IST

राहुल गांधींच्या जेवणावरुन वाद निर्माण झाल्यानंतर हॉटेलकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली: कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वादात सापडले आहेत. राहुल गांधींनी यात्रेदरम्यान मांसाहार केल्याचं वृत्त नेपाळमधील प्रसारमाध्यमांनी दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन भाजपानं राहुल गांधींवर टीका केली आहे. कैलास मानसरोवर यात्रेला गेले असताना मांसाहार करुन राहुल गांधींनी हिंदूंच्या भावना दुखावल्याची टीका भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली आहे. हा वाद पेटल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनानं स्पष्टीकरण देत राहुल गांधींनी शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले राहुल गांधी 31 ऑगस्टला काठमांडूतील वूटू नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. टी-शर्ट आणि जिन्स घालून हॉटेलमध्ये गेलेल्या राहुल यांचा फोटो हॉटेल व्यवस्थापनानं सोशल मीडियावर शेअर केला होता. 'राहुल गांधींनी हॉटेलला सरप्राईज भेट देत नेवारी भोजनाचा आनंद घेतला,' अशी पोस्ट व्यवस्थापनाकडून फेसबुकवर करण्यात आली होती. यानंतर स्थानिक माध्यमांनी राहुल गांधींनी मांसाहारी जेवण घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं. राहुल यांना चिकन कुरकुरे अतिशय आवडल्याचंदेखील नेपाळी प्रसिद्धी माध्यमांनी वृत्तांकन करताना म्हटलं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. यावरुन भाजपानं राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली. हिंदूंच्या भावनांचा अपमान करणं राहुल गांधी आणि काँग्रेससाठी नवीन नाही, अशा शब्दांमध्ये भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय राहुल गांधींवर बरसले.या वादानंतर वूटू रेस्टॉरंटकडून स्पष्टीकरण करण्यात आलं. राहुल गांधींनी फक्त शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं, असं रेस्टॉरंटकडून सांगण्यात आलं. प्रसार माध्यमांनी आमच्याकडून राहुल यांच्या जेवणाविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती, असंही रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. 'राहुल गांधींनी कोणते पदार्थ ऑर्डर केले होते, याबद्दल आमच्याकडे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की, राहुल गांधी यांनी शुद्ध शाकाहारी पदार्थ मागवले होते,' असं वूटू रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनानं म्हटलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस