मुलायम सिंहांना सामूहिक बलात्काराचा अनुभव आहे का - गिरिराज सिंह

By Admin | Updated: August 23, 2015 19:49 IST2015-08-23T19:49:37+5:302015-08-23T19:49:37+5:30

मुलायम सिंह यांना सामूहिक बलात्काराचा अनुभव आहे का असा वादग्रस्त सवाल करत केंद्रीय राज्यमंत्री व भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी नवीन वाद निर्माण केला आहे.

Did Mulayam Singhs have gang rape experience - Giriraj Singh | मुलायम सिंहांना सामूहिक बलात्काराचा अनुभव आहे का - गिरिराज सिंह

मुलायम सिंहांना सामूहिक बलात्काराचा अनुभव आहे का - गिरिराज सिंह

>ऑनलाइन लोकमत 
गया (बिहार), दि. २३ - मुलायम सिंह यांना सामूहिक बलात्काराचा अनुभव आहे का असा वादग्रस्त सवाल करत केंद्रीय राज्यमंत्री व भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. मुलायम सिंह यांच्या सामूहिक बलात्कारासंदर्भातील विधानावर प्रतिक्रिया देताना गिरिराज सिंह यांनी हा नवा वाद ओढावून घेतला आहे. 
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी काही दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कारावरुन वादग्रस्त विधान केले होते. एका महिलेवर चार पुरुष बलात्कार करु शकत नाही, हे अशक्यच आहे असे मुलायम सिंह यांनी म्हटले होते. मुलायम सिंह यांच्या या विधानावर रविवारी गिरिराज सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. गिरिराज म्हणाले, सामूहिक बलात्कार अशक्य असल्याचे मुलायम सिंह यादव म्हणतात. ते ज्येष्ठ नेते असून त्यांना याचा अनुभव आहे का असे बेताल विधान त्यांनी केले. गिरिराज सिंह यांच्या विधानाने भाजपाची पुन्हा एकदा कोंडी होण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: Did Mulayam Singhs have gang rape experience - Giriraj Singh