धुळे/नंदुरबार व हॅलो ग्रामीणसाठी अखेर १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ उमविचा निर्णय: विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
(उमविचे संग्रहित छायाचित्र घेणे)
धुळे/नंदुरबार व हॅलो ग्रामीणसाठी अखेर १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ उमविचा निर्णय: विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
(उमविचे संग्रहित छायाचित्र घेणे) जळगाव : पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता. अखेर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाने १० टक्के प्रवेशवाढीचा निर्णय घेतला असून त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या विद्यार्थ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या प्राचार्यांच्या बैठकीत यंदा महाविद्यालयात असलेल्या प्रवेश क्षमतपेक्षा अतिरीक्त प्रवेश देवू नये, असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यामुळे उशिराने प्रवेश घेणार्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. मात्र, विद्यार्थी संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी दहा टक्के प्रवेशवाढ करण्यात येणार आहे. इन्फोबॉक्स कोट-विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, म्हणून दहा टक्के प्रवेश वाढीचा निर्णय विद्यापीठस्तरावर घेण्यात येत आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात येऊन यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. -प्रा. सुधीर मेश्राम, कुलगुरु, उमवि.