धुळे दंगल; एकास अटक १५ जणांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:19+5:302015-05-18T01:16:19+5:30
धुळे : शहरातील मच्छीबाजार कसाबवाडा परिसरात शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास क्रिकेटच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांतील १५ जणांवर गुन्हा दाखल केला असून नासीर हुसेन महंमद अब्बास अन्सारी (४२) यास अटक केली आहे.

धुळे दंगल; एकास अटक १५ जणांवर गुन्हा दाखल
ध ळे : शहरातील मच्छीबाजार कसाबवाडा परिसरात शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास क्रिकेटच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांतील १५ जणांवर गुन्हा दाखल केला असून नासीर हुसेन महंमद अब्बास अन्सारी (४२) यास अटक केली आहे...................................................................... परस्पर हाणामारीत जखमी झालेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ताब्यात घेण्यात येण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सशस्त्र हाणामारीत अख्तर हुसेन महंमद अन्सारी व यासीर अस्लम अन्सारी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरात तणावसदृश्य परिस्थिती असल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर घटनास्थळी समाजातील नेतेमंडळींनी बैठक घेत प्रकरण आटोपते घेण्याचे आवाहन दोन्ही गटांना केले. आझादनगर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून दोन्ही गटांकडून वापरण्यात आलेली काही हत्यारे, बॅट, लाकडी दांडा आदी साहित्य जप्त केले आहे. (प्रतिनिधी)-------------------(फोटो- १६धुळे)------------------धुळे दंगलीत वापरण्यात आलेले साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे.