धोनीची याचिका, आयपीएस कुमार यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:20 IST2024-04-13T06:19:49+5:302024-04-13T06:20:14+5:30

न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी निश्चित केली आहे.

Dhoni's plea, relief to IPS Kumar | धोनीची याचिका, आयपीएस कुमार यांना दिलासा

धोनीची याचिका, आयपीएस कुमार यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याने दाखल केलेल्या न्यायालयाच्या अवमान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार यांना देण्यात आलेली १५ दिवसांच्या साध्या कैदेवरील अंतरिम स्थगिती दिली आहे.

न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी निश्चित केली आहे. २०१४ मध्ये आयपीएल सट्टेबाजी घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर धोनीने माजी पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: Dhoni's plea, relief to IPS Kumar