बळजबरीने दिलेल्या लॉटरीच्या तिकिटाने धर्मपाल करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:24 IST2020-08-22T06:24:01+5:302020-08-22T06:24:11+5:30
शुक्रवारची सकाळ उजाडल्यानंतर आपण कोट्यधीश (करोडपती) झाल्याचे कळले. लॉटरी एजंटाने त्यांना बळजबरीने दिलेल्या तिकिटाला दीड कोटीची लॉटरी लागली.

बळजबरीने दिलेल्या लॉटरीच्या तिकिटाने धर्मपाल करोडपती
चंदीगड : कुणावर नशीब कधी मेहरबान होईल, सांगता येणार नाही. हरयाणातील सिरसा जिल्ह्यातील कालांवली येथील धर्मपाल यांच्याबाबतीत याच उक्तीचा प्रत्यय आला. त्यांचे मिठाईचे दुकान आहे. शुक्रवारची सकाळ उजाडल्यानंतर आपण कोट्यधीश (करोडपती) झाल्याचे कळले. लॉटरी एजंटाने त्यांना बळजबरीने दिलेल्या तिकिटाला दीड कोटीची लॉटरी लागली.
लॉटरी एजंटाकडून त्यांनी २५०-२५० रुपयांची पाच तिकिटे खरेदी केली होती. तासाभराने पुन्हा हा एजंट धर्मपालच्या दुकानात आला आणि म्हणाला, एकच तिकीट उरले आहे, तेही खरेदी करा. एजंट बळजबरीने तिकीट त्यांच्या हातात कोंबत म्हणाला की, तिकीट तुम्हाला घ्यावेच लागेल, कोणास ठाऊक याच तिकिटाने तुमचे नशीब पालटू शकते. अखेर धर्मपालने ते तिकीटही खरेदी केले. शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर ते करोडपती झाले होते.