धर्मद्वेषाला थारा नाहीच- मोदींचा इशारा धार्मिक स्वातंत्र्य जपणार : चर्चवरील हल्ल्यानंतर प्रथमच तोडले मौन

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:14+5:302015-02-18T00:13:14+5:30

नवी दिल्ली : कोणत्याही धार्मिक गटाला द्वेष पसरविण्याला मुळीच थारा दिला जाणार नाही. धार्मिक हिंसाचाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा खणखणीत इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे चर्चवरील हल्ल्याच्या घटनांनंतर प्रथमच मौन तोडले आहे.

Dharma is not a religion, Modi's warning will lead to religious freedom: Chunla silence for the first time after church attack | धर्मद्वेषाला थारा नाहीच- मोदींचा इशारा धार्मिक स्वातंत्र्य जपणार : चर्चवरील हल्ल्यानंतर प्रथमच तोडले मौन

धर्मद्वेषाला थारा नाहीच- मोदींचा इशारा धार्मिक स्वातंत्र्य जपणार : चर्चवरील हल्ल्यानंतर प्रथमच तोडले मौन

ी दिल्ली : कोणत्याही धार्मिक गटाला द्वेष पसरविण्याला मुळीच थारा दिला जाणार नाही. धार्मिक हिंसाचाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा खणखणीत इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे चर्चवरील हल्ल्याच्या घटनांनंतर प्रथमच मौन तोडले आहे.
दिल्लीत पाच चर्चवर आणि एका ख्रिश्चन मिशनरी शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर मोदी हे अशा घटनांकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि काही ख्रिश्चन गटांनी केला होता. सर्व धर्मांचा समान आदर केला जाईल. धार्मिक श्रद्धा जोपासण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्याची खबरदारी माझे सरकार घेईल. प्रत्येकाला कोणत्याही प्रभावाखाली न येता आपला धर्म कायम राखण्याचा किंवा दुसरा धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. कोणत्याही धार्मिक गटाला मग तो अल्पसंख्यक असो की बहुसंख्यक छुप्या किंवा उघडउघड पद्धतीने धार्मिक विद्वेष पसरविण्याला मुभा दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.
कुरियाकोस ऊर्फ चवारा आणि मदर युफ्रेशिया यांना संतपद बहाल करण्यात आल्याबद्दल विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय सत्कार समारंभात त्यांनी धार्मिक स्वातंत्र्याची भूमिका स्पष्ट केली.
-----------------
धार्मिक हिंसाचाराची तीव्र निंदा
धार्मिक हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या घटकांना कठोर इशारा देताना पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही कृतीआड आम्ही कोणत्याही धर्माविरुद्धचा हिंसाचार खपवून घेणार नाही. अशा हिंसाचाराची मी तीव्र निंदा करतो. धर्माच्या आधारावर विभागणी आणि वाढते वैमनस्य ही जागतिक चिंतेची बाब बनली आहे. प्रत्येक धर्माचा आदर ही प्राचीन भारतापासून चालत आलेली शिकवण आता कुठे जागतिक आध्यात्मिक संदेशात समाविष्ट होऊ लागली आहे. सध्या जग स्थित्यंतराच्या स्थितीत असून आम्ही हा पल्ला योग्यरीत्या ओलांडला नाही तर धर्मांधता, कट्टरतावाद आणि रक्तपाताच्या अंधारात फेकले जाऊ. जग तिसऱ्या सहस्रकात पोहोचले तरी तरी धार्मिक सलोख्याचे लक्ष्य गाठणे अवघड जाईल.
------------------
भारतीयांच्या डीएनएमध्येच
आदराची शिकवण
भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांचे विचार मांडताना मोदी म्हणाले की, सर्व धर्मांबद्दल समान आदर हा प्रत्येक भारतीयांच्या रक्तात(डीएनए)असायलाच हवा. प्राचीन भारतातील संयम आणि परस्पर आदर, सहिष्णुता ही सर्व धर्मांनी खऱ्या अर्थाने अंगिकारायला हवी.
-------------------
ओबामांच्या विधानाचा संदर्भ
भारतात अलीकडे धार्मिक आधारावर सर्व प्रकारची असहिष्णुता वाढीस लागल्याचे पाहता महात्मा गांधींनाही धक्का बसला असता असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले होते. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत मोदींनी धार्मिक वैमनस्य हा जागतिक चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट केले.
------------------------
हेग कराराचे स्मरण
हेग येथे २००८ मध्ये झालेल्या मनावाधिकार परिषदेतील कराराचे स्मरणही मोदींनी करवून दिले. धार्मिक आधारावर सामंजस्याची गरज दीर्घ काळपासून अधोरेखित होत आली आहे. हा करार ऐतिहासिक असून त्यात धार्मिक स्वातंत्र्य आणि त्याचे रक्षण कसे करायचे हे निश्चित केले आहे. या करारातील प्रत्येक शब्दाला माझे सरकार बांधील राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
-----------------------
सबका साथ, सबका विकास....
सबका साथ सबका विकास हा विकासाचा मंत्र आहे. त्याचा अर्थ प्रत्येकाला अन्न, प्रत्येक मुलाला शाळेत प्रवेश, प्रत्येकाला रोजगार, प्रत्येक कुटुंबाला निवारा, शौचालय, वीज हा आहे. ऐक्यातूनच हे शक्य असून ती बाब भारतासाठी अभिमानाची असेल. ऐक्य हेच आपल्याला बळकट करेल तर विघटन कमकुवत बनवेल. ही मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी ,अशी विनंती मी प्रामाणिकपणे करीत आहे, या शब्दांत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

Web Title: Dharma is not a religion, Modi's warning will lead to religious freedom: Chunla silence for the first time after church attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.