शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: ड्रग्ज पेडलर गोळेच्या पतीविरुद्ध गुन्हा, आरोपींची संख्या पोहोचली बारावर

By बाबुराव चव्हाण | Updated: March 1, 2025 22:41 IST

Dharashiv Crime News: तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. शनिवारी मुंबई येथील ड्रग्ज पेडलर महिला संगीत गोळेच्या पतीविरुद्ध तामलवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

- बाबुराव चव्हाण 

धाराशिव/तामलवाडी - तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. शनिवारी मुंबई येथील ड्रग्ज पेडलर महिला संगीत गोळेच्या पतीविरुद्ध तामलवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामुळे आता आरोपींची संख्या बारावर पोहोचली असून यापैकी सहाजण अटकेत तर उर्वरित सहा फरार आहेत. दरम्यान, यापैकी चौघांची नावे गोपनीय ठेवली आहेत.

तामलवाडी टोलनाका परिसरात ४५ ग्रॅम ड्रग्जसह तिघांना बेड्या ठोकल्या होत्या.  त्यांच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी तपासला गती दिली. संबंधित आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज पेडलर मुंबईतील एक महिला असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर विशेष पथकाने मुंबईत जावून पेडलर संगीता गोळे या महिलेस अटक केली. गोळे हिची कसून चौकशी केली असता, तिच्या एक वर्षाच्या मुलीचा सांभाळ करणारा मानलेला भाऊ संतोष खोत यास गुरुवारी रात्री अटक केली. शुक्रवारी त्यास १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

तुळजापूर पंचायत समितीच्या माजी सभापतीचा मुलगा विश्वनाथ मुळे यास शुक्रवारी मध्यरात्री ठाण्यातून अटक करण्यात आली. शनिवारी त्यास पोलीस कस्टडी मिळाली असतानाच पेडलर महिला गोळेचा पती वैभव गोळे याच्याविरुद्धही शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. तो सध्या फरार आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. तर सहा आरोपी फरार आहेत. यापैकी चौघांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. त्यांना कुठलीही क्षणी बेड्या पडू शकतात. प्रकरणाचा तपास गोकुळ ठाकूर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव