इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 05:27 IST2025-12-11T05:24:40+5:302025-12-11T05:27:40+5:30
आठ जणांचे ओव्हरसाइट पथक केले स्थापन

इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
नवी दिल्ली/मुंबई : विमान प्रवाशांना मनस्ताप देणाऱ्या इंडिगो कंपनीच्या रोजच्या कामकाजावर थेट डीजीसीएची ८ सदस्यांची टीम लक्ष ठेवणार आहे. या गोंधळाबद्दलचा अहवाल घेऊन गुरुवारी हजर राहावे, असे आदेश डीजीसीएने इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) पीटर एल्बर्स यांना दिले.
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
डीजीसीए विशेष ‘ओव्हरसाइट टीम’ स्थापन केली आहे.
ही परिस्थिती इतकी गंभीर का झाली आणि सरकारने आतापर्यंत काय केले?
इंडिगोने नवे नियम १ नोव्हेंबरपर्यंत लागू केले नाहीत, तरी केंद्र आणि डीजीसीएने वेळेवर कारवाई का केली नाही?
तुमच्याकडे कारवाई करण्याचे अधिकार नाहीत का? की तुम्ही असहाय्य आहात?
५,००० रुपयांचे तिकीट
३० ते ३५ हजार रुपयांवर
कसे गेले? सरकारने अशा विमान कंपन्यांना एवढी मुभा कशी दिली?
नियम पाळले नाहीत
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा म्हणाले, इंडिगोने सूचना देऊनही नियमांचे पालन केले नाही.
न्यायालयाने कंपनीला विचारले : जे प्रवासी आठवडाभर विमानतळांवर अडकले, यातना सोसल्या त्यांचे काय?