शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir: राम मंदिरासाठी भक्तांनी खुली केली धनाची 'पेटी', बांधकामासाठी जमा झाले कोटीच्या कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:35 IST

Ayodhya Ram Mandir Construction: भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत श्री रामाचे भव्य आणि दिव्य मंदिर बांधले जात आहे.

अयोध्या : भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत श्री रामाचे भव्य आणि दिव्य मंदिर बांधले जात आहे. मंदिराचे बांधकाम तसेच पूजा पाहण्यासाठी दूरदूरवरून भाविक दररोज अयोध्येत पोहोचत आहेत. मागील वर्षी 2022 मध्ये राम भक्तांनी त्यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी भरघोस दान केले. कारण 2022 या वर्षामध्ये रामभक्तांनी त्यांची कमाई मोठ्या प्रमाणात प्रभू श्रीरामाला समर्पित केली होती. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी श्रीरामाच्या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 20 कोटी रुपये दान करण्यात आले आहेत.

अयोध्येतील रामाचे बहुप्रतिक्षित भव्य मंदिर नियोजित वेळेच्या मर्यादेनुसार जलद गतीने बांधले जात आहे. मंदिर उभारणीच्या प्रगतीबाबत ट्रस्टचे अधिकारी वेळोवेळी मंदिर बांधकामाची स्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे मंदिराचे बांधकाम ऑक्टोबर 2023 मध्ये पूर्ण होईल आणि जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी गर्भगृहात रामाची प्रतिष्ठापना केली जाईल. 

नवीन वर्षात भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, 2022 मध्ये जवळपास 20 कोटी रुपये देणगी राम मंदिराच्या बांधकामासाठी मिळाली आहे. रामभक्त दर महिन्याला एक कोटींहून अधिक रुपये श्रीरामाला अर्पण करतात. यासोबतच ऑनलाइन चेकद्वारेही देणगी दिली जात आहे. मागील वर्षभरात एकूण 20 कोटी रुपये मिळाले आहेत. भाविकांची संख्या आणखी वाढल्यास श्रीरामाच्या मंदिराच्या उभारणीसाठी भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देतील. प्रकाश गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षाच्या दिवशी कडाक्याच्या थंडीने धुके झाकले होते. असे असूनही भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी हजेरी लावली होती. सकाळी सहा वाजल्यापासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण अयोध्येत केवळ भाविकच दिसत होते. एक लाखाहून अधिक भाविकांनी प्रभू श्रीराम यांची पूजा करून नवीन वर्षाची सुरुवात केली

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश