Devendra Fadnavis infected with corona, appeals to people in contact | Devendra Fadnavis tests positive for Covid-19: देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, संपर्कातील व्यक्तींना आवाहन

Devendra Fadnavis tests positive for Covid-19: देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, संपर्कातील व्यक्तींना आवाहन

मुंबई -  भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह  Corona Positive आली असून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तसेच, माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी क्वारंटाईन व्हावे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिलाय. 

देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून ते महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत होते. ''लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !, असे ट्विट फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांना नेमकी कोठून कोरोनाची लागण झाली, याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना काळजी घेत, कोरोना चाचणी करावी, असे आवाहन खुद्द फडणवीस यांनी केले आहे. 

देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. त्यामध्ये, राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केलंय. 

सुशील कुमार मोदींनाही लागण

कोरोना महामारीच्या संकटात बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपा जेडीयू याठिकाणी एकत्र निवडणूक लढवत आहेत. भाजपाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला असून यात मुख्य म्हणजे कोरोनाचा महामारीचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, बिहारचे उपमुख्यमंत्री आण भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली. फडणवीस हेही बिहारच्या दौऱ्यावर होते, त्यामुळे त्यांना नेमकं कोरोनाची लागण कोठून झाली, याची माहिती घेण्यात येत आहे. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Devendra Fadnavis infected with corona, appeals to people in contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.