दलित वस्तीमधील विकास कामांना मुहूर्त मिळेना
By Admin | Updated: May 7, 2014 00:26 IST2014-05-06T16:46:19+5:302014-05-07T00:26:41+5:30
बाभुळगाव: अक ोला पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्तीमधील विकास कामांसाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला असून, चार-पाच महिने उलटून गेले तरी, या कामांना मुहूर्त मिळालेला नाही. हा निधी आपणच खेचून आणल्याचा दावा करणार्या काही लोकप्रतिनिधींमुळे ही विकास कामे करण्यासंबंधीचे अर्ज मागविण्यासाठी विलंब होत असल्याचा आरोप पंचायत समितीमधील भारिप बमसंच्या गटनेत्याने केला आहे.

अक ोला पंचायत समिती अंतर्गत येणार्या ग्रामपंचायतींच्या दलित वस्तीमधील विकास कामांसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून सिमेंट काँक्रिटचे रस्ते, नाल्या आदी विकास कामे केली जाणार आहेत. तथापि, चार-पाच महिने उलटून गेले तरी, या कामांना मुहूर्त मिळाला नाही. हा निधी जि.प. च्या डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीपूर्वीच मंजूर झाला होता. हा निधी आम्हीच मिळवून दिल्याचे सांगत काही लोकप्रतिनिधी विकास कामाचेे कंत्राट त्यांच्या मर्जीतील व्यक्तीला देण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे ही कामे खोळंबली असल्याचा आरोप पंचायत समितीमधील भारिप बमसंच्या गटनेत्याकडून करण्यात येत आहे. नियमानुसार या कामांचे कंत्राट मागासवर्गीय सुशिक्षित अभियंते व मान्यताप्राप्त सुशिक्षित बेरोजगार संस्थांनाच देणे बंधनकारक असून, त्यांना हे कंत्राट मिळाले नाही, तर आपण संबंधित ग्रामपंचायत सचिव व गटविकास अधिकार्यांवर कारवाईची मागणी करू, असेही पं.स. गटनेत्यांनी म्हटले आहे.
जि.प.चे काही सदस्य गावात आरक्षणानुसार मिळणारा शासनाचा निधी आम्हीच आणल्याचे ग्रामपंचायत पदाधिकार्यांना भासवून स्वत:च ही कामे क रतात. हा निधी ग्रा.प.चे सचिव व गटविकास अधिकार्यांच्या स्वाक्षरीने निघत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकार्यांना या निधीमधून होणार्या कामांपासून दूर ठेवून थातूरमातूर काम करण्यात येत असल्याचे ऐकिवात आहे.