शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही हिंसेला विकास हेच उत्तर- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 17:03 IST

छत्तीसगडमध्ये मोदींकडून विविध प्रकल्पांचं उद्घाटन

रायपूर: कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच उत्तर असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमध्ये केलं. यावेळी त्यांनी राज्यातील नक्षलवादाविषयी चिंता व्यक्त केली. नक्षलवाद हा विकासानंच दूर होऊ शकतो, असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून त्यांच्याकडून विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येत आहे. 'कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच उत्तर असू शकतं, असा विश्वास मला वाटतो. विकासामुळे निर्माण झालेल्या विश्वासामुळे सर्व प्रकारची हिंसा दूर सारली जाऊ शकते,' असं मोदींनी छत्तीसगडमध्ये आयोजित केलेल्या रॅलीला संबोधित करताना म्हटलं. छत्तीसगडमध्ये वर्षाच्या अखेरीस निवडणूक होत आहे. छत्तीसगडमधील नक्षली कारवायांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना विकासाचं नक्षलवाद्याला उत्तर असू शकतं, असं मोदी म्हणाले. भाजपा सरकारमुळे लोकांचा छत्तीसगडकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला, असंही मोदी म्हणाले. 'छत्तीसगड आधी जंगल आणि आदिवासी लोकांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता ते नवीन रायपूरमधील स्मार्ट सिटीसाठी ओळखलं जातं,' असं पंतप्रधानांनी म्हटलं. दुर्गम भागातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा आणि आदिवासींच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं यावेळी मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण