शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 05:25 IST

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे.

शिमला:हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या अनेक घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसामुळे अनेक घरे, पूल आणि रस्ते वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, कुल्लूमधील निर्मंद, सेंज, मलाना, मंडीतील पदर आणि शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे ढगफुटी झाली. समेज खुड (नाला) मध्ये ढगफुटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आणि इतर २८ जण बेपत्ता आहेत. घटनास्थळावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहे.

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.

राज्यात बुधवारपासून मुसळधार

हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात सर्वाधिक २१२ मिमी पावसाची नोंद पालमपूरमध्ये झाली. यानंतर चौरीमध्ये २०३, धर्मशालामध्ये १८३.२ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

अमित शाह यांनी घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याशी बोलून राज्यातील ढगफुटीमुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील ढगफुटीमुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल दु:ख व्यक्त केले.

देशात कुठे काय झाले?

-दिल्लीत मुसळधार पाऊस, विविध दुर्घटनांत तीन ठार-पंजाब-हरयाणात जोरदार पाऊस, प. बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा.-बिहारच्या जेहानाबाद आणि रोहतास जिल्ह्यात वीज पडून ५ जणांचा मृत्यू.-पावसाळ्यात मध्य प्रदेशातील ३ जिल्ह्यांमध्ये अतिसारामुळे १७ जणांचा मृत्यू.-गुरुग्रामममध्ये मुसळधार पावसामुळे मेट्रो रेल्वेस्थानकाजवळ तिघांना विजेचा धक्का बसला.-पाकिस्तानच्या लाहोरमध्ये धुँवाधार पाऊस, एक ठार , ४४ वर्षांतील सर्वाधिक पाऊस येथे झाला आहे.-जयपूरमधील घराच्या तळघरात पावसाचे पाणी घुसून पती-पत्नी, भाची बुडाली.-उत्तराखंडमध्ये ७ जणांचा मृत्यू.

 

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशdelhiदिल्लीHaryanaहरयाणाBiharबिहारRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश