मालेगावात बीएसएनएल इंटरनेटच्या खंडित सेवेमुळे व्यवहार ठप्प
By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST
मोबाईल सेवाही नॉट रिचेबल
मालेगावात बीएसएनएल इंटरनेटच्या खंडित सेवेमुळे व्यवहार ठप्प
मोबाईल सेवाही नॉट रिचेबलमालेगाव : सद्यस्थितीत सर्वच क्षेत्रात इंटरनेटचा वापर होत आहे़ परंतु मालेगाव परिसरात गत अनेक दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट व दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत असल्यामुळे सेतु सुविधा, बँका व इतर ऑनलाईन सेवा बंद होत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे़मालेगाव येथे दोन राष्ट्रीयकृत बँका व सेतू केंद्राबरोबरच अनेक ऑनलाईन सेवा देणारे केंद्र आहेत़ बहुतांश केंद्रांना बीएसएनएलची सेवा जोडलेली आहे़ गत अनेक दिवसांपासून अचानक ही सेवा खंडित होत आहे़ यामुळे बँकेतील व्यवहारही तासन्तास खोळंबून चालले आहेत़ शिवाय शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना बँकेतून अनुदान मिळत असून त्यासाठी सातबारा व इतर कागदपत्रे लागत आहेत़ हे सर्व सेतु सुविधा केंद्रातून मिळत असतात़ परंतु इंटरनेट सेवा बंद झाल्याने शेतकर्यांना दिवसेंदिवस इंटरनेटची कनेक्टीव्हीटीची प्रतीक्षा करावी लागत आहे़ शिवाय इतर ऑनलाईन व इंटरनेटवर आधारित कामे वारंवार कामे खंडित सेवेकडून कोलमडत चालली आहे़ अनेक ग्राहकांचे मोबाईल नॉट रिचेबल राहत असून संपर्क करणेही अवघड झाले आहे़ मालेगाव व परिसरात बीएसएनएलची वारंवार खंडित होणारी इंटरनेटची सेवा त्वरित सुरू करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे़कोटमालेगाव व परिसरात अनेकजण बीएसएनएलचे ग्राहक आहेत़ सेतु सुविधा केंद्रातून विद्यार्थी व शेतकर्यांना महत्त्वाची कागदपत्रे मिळतात़ परंतु इंटरनेटची सेवा वारंवार खंडित होत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे - कृष्णा इंगोले, सेतू सुविधा संचालक मालेगाव़