शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं पोस्टर्स झळकावले ; "मी सावरकर नाही तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 20:04 IST

या पोस्टरमुळे महाराष्ट्रातील राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

वायनाड - वीर सावरकर मुद्द्यांवरून सातत्याने वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधींनाउद्धव ठाकरेंनी मालेगाव सभेत जाहीर इशारा दिला होता. सावरकर हे आमचे दैवत आहेत त्यांच्याविरोधात काही बोलाल तर खपवून घेतले जाणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधींवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महाविकास आघाडीवर परिणाम नको यासाठी राहुल गांधींनी सावरकर मुद्दा घेणे टाळणार असल्याचं म्हटलं. परंतु काँग्रेस पक्षाने लावलेल्या पोस्टरमुळे पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

वायनाड येथे दौऱ्यावर असणाऱ्या राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यानी पोस्टर्स लावले होते. त्यात एका स्थानिक नेत्याने वीर सावरकरांचा अपमान करणारे पोस्टर्स लावले. मी सावरकर नाही, गांधी, माफी मागणार नाही असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आले. या पोस्टरमुळे महाराष्ट्रातील राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात तुम्ही माफी मागणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा राहुल गांधींनी थेट माझे नाव सावरकर नाही तर गांधी आहे असं विधान केले होते. त्यावरून उद्धव ठाकरेंनी इशारा दिला होता. महाविकास आघाडी कुठलाही वाद नको यासाठी काँग्रेसनं सावरकर मुद्द्यांवर नो कमेंट्स ठरवले होते. परंतु वायनाडमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो होता. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना शहरात बॅनरबाजी केली होती. त्यात मल्याळम भाषेत अनेक पोस्टर्स लागले होते. त्यात मी सावरकर नाही, माफी मागून पळून जाईन. विशेष म्हणजे राहुल गांधींची जिथे सभा होती त्याठिकाणी हे पोस्टर्स झळकत होते. 

२८ मे हा दिवस महाराष्ट्रात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन" घोषितस्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे