शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन राज्यांत घमासान, दिल्लीत माेर्चेबांधणी; भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 09:51 IST

मुख्यमंत्रीपद मी तर दावेदारच नाही : शिवराज, राजस्थानात पाच आमदार रिसॉर्टमध्ये? 

भोपाळ/जयपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. कैलाश विजयवर्गीय ते प्रल्हाद पटेल, नरेंद्रसिंह तोमर ते व्ही. डी. शर्मा यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. ‘मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार नाही,’ असे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत ग्वाल्हेरमध्ये तोमर यांचे ‘बॉस’ म्हणून पोस्टर लावण्यात आले आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय विधिमंडळ बैठकीनंतर घेतला जाईल, आमदार आपापल्या मतदारसंघात असून, बैठकीसाठी जयपूरला येतील, असे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी म्हणाले.

 ...अन् आमदारांना आणले कार्यालयात: राजस्थानात पाच आमदार रिसॉर्टमध्ये? 

भाजपचे पाच आमदार मंगळवारी जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये एकत्र राहिल्यामुळे ‘लॉबिंग’ची अटकळ सुरू झाली. मात्र, सी. पी. जोशी यांनी अशी कोणतीही शक्यता फेटाळून लावली. कोटा विभागातील आमदारांनी मंगळवारी रात्री सीकर रोडवरील एका रिसॉर्टमध्ये ‘चेक इन’ केले. त्यापैकी एक, ललित मीना (किशनगंज) यांना शंका आली की, त्यांना रिसॉर्टमध्ये अडकवून ठेवण्यात येत आहे. त्यांनी वडील हेमराज मीना यांना ही माहिती दिली. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवण्यात आले. पक्षाचे काही नेते ‘रिसॉर्ट’वर पोहोचले आणि आमदारांना कार्यालयात आणण्यात आले. 

मुख्यमंत्री निवडीला विलंब; कॉंग्रेसची टीकामध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेस होत असलेल्या विलंबावरून काँग्रेसने गुरुवारी भाजपला चिमटा काढला.  निवडणूक निकालाला चार दिवस उलटूनही भाजपला या राज्यांतील मुख्यमंत्री ठरवता आलेले नाहीत, असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले

टॅग्स :BJPभाजपाChhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्री