शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

वडिल बँकेत मॅनेजर असूनही तो राजकारणी, नोकरशहांच्या घरात करायचा चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 2:59 PM

काही जणांना नाईलाजाने परिस्थितीमुळे चोरीचा मार्ग पत्करावा लागतो तर, काहीजण आपले महागडे शौक पुरे करण्यासाठी चो-या, लुटमारी करतात.

ठळक मुद्देसिद्धार्थचे वडिल बँकेत मॅनेजर आहेत.सिद्धार्थ उच्चभ्रूंच्या वस्तीला लक्ष्य करत होता.

नवी दिल्ली, दि. 22 - काही जणांना नाईलाजाने परिस्थितीमुळे चोरीचा मार्ग पत्करावा लागतो तर, काहीजण आपले महागडे शौक पुरे करण्यासाठी चो-या, लुटमारी करतात. दिल्ली पोलिसांनी अशाच एका हायप्रोफाईल चोराला अटक केली आहे.  सिद्धार्थ मेहरोत्रा असे आरोपीचे नाव असून तो पेशाने ग्राफीक डिझायनर आहे. सिद्धार्थचे वडिल बँकेत मॅनेजर आहेत. सिद्धार्थ दिवसा सर्वांना आपला श्रीमंती थाट दाखवायचा. त्याची आलिशान कार, महागडया वस्तू पाहिल्यानंतर सिद्धार्थ कुठल्या तरी गर्भश्रीमंताचा मुलगा आहे असे समोरच्याला वाटायचे. पण खरतर सिद्धार्थ त्याची ही खोटी श्रीमंती दाखवण्यासाठी दिल्लीतील नेते, नोकरशहा, अधिकारी आणि व्यावसायिकांच्या घरात चो-या करत होता. 

सिद्धार्थ उच्चभ्रूंच्या वस्तीला लक्ष्य करत होता. आधी तो तिथे जाऊन सर्व पाहणी करायचा.  बंगल्याचा सुरक्षारक्षक आणि बंगल्याच्या आत राहणा-या लोकांमध्ये इंटरकॉमची सुविधा नसल्याचे जेव्हा त्याच्या लक्षात आले. तेव्हा सिद्धार्थने अशा घरांमध्ये चोरी सुरु केली. सिद्धार्थ आणि त्याचा सहकारी अनुराग सिंह ज्या घरात चोरी करायचीय तिथपासून काही अंतरावर गाडी उभी करायचे. सिद्धार्थ दरवाजावरची बेल वाजवल्यानंतर लपून बसायचा कोणी दरवाजा उघडतोय का ? हे तपासण्यासाठी तो असे करायचा. जर कोणी दरवाजा उघडला नाही तर, त्या घरात कोणी नाही हे स्पष्ट व्हायचे. त्यानंतर सिद्धार्थ अशा घरात घुसून चो-या करायचा. त्यावेळी त्याचा साथीदार बाहेर थांबून लक्ष ठेवायचा. 

जानेवारीपासून दक्षिण दिल्लीत उच्चभ्रूवस्तीमध्ये चोरी, लुटमारीच्या घटना वाढल्यामुळे दिल्ली पोलिसांनी टीम बनवली. या टीमने काही छापेदेखील मारले पण त्यातून फार काही हाती लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी फेसबुकवर शोध सुरु केला. त्यावेळी घरफोडीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तीबरोबर सिद्धार्थची शरीरयष्टी मिळत होती. पोलिसांनी सिद्धार्थचे फेसबुक अकाऊंट तपासले तेव्हा त्याची हायप्रोफाईल लाईफस्टाईल दिसून आली. त्यावरुन पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी सिद्धार्थला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जितेंदर आणि अनुराग सिंह या दोघांच्या मदतीने आपण घरफोडी करायचा असे त्याने सांगितले. लाल किल्ल्याजवळून त्याला अटक करण्यात आली. जितेंदर सिद्धार्थकडून चोरीच्या वस्तू विकत घ्यायचा. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली