अयोध्येत राम मंदिर उभारावे ही जनतेची इच्छा - राम नाईक

By Admin | Updated: December 12, 2014 14:33 IST2014-12-12T11:09:13+5:302014-12-12T14:33:43+5:30

अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागेवर लवकरात लवकर राम मंदिर उभारावे ही भारतीय जनतेची इच्छा असून ती पूर्ण झाली पाहिजे, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले आहे.

The desire of the people to raise the Ram temple in Ayodhya - Ram Naik | अयोध्येत राम मंदिर उभारावे ही जनतेची इच्छा - राम नाईक

अयोध्येत राम मंदिर उभारावे ही जनतेची इच्छा - राम नाईक

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ -  अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागेवर लवकरात लवकर राम मंदिर उभारावे ही भारतीय जनतेची इच्छा  असून ती पूर्ण झाली पाहिजे, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले आहे. गुरूवारी राम मनोहर लोहिया युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत मांडले.
दरम्यान नाईक यांच्या वक्तव्यावर विरोदी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राम मंदिर केव्हा बनेल हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनातील प्रश्न आहे, असे यापूर्वीही नाईक यांनी म्हटले होते. तसेच पंतप्रदान नरेंद्र मोदी याप्रकरणी विचार करत असून येत्या पाच वर्षांत राम मंदिराच्या मुद्यावर सर्वसंमत्तीने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

Web Title: The desire of the people to raise the Ram temple in Ayodhya - Ram Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.