लोकशाहीला मनमर्जीचा धोका
By Admin | Updated: December 10, 2015 23:17 IST2015-12-10T23:17:58+5:302015-12-10T23:17:58+5:30
लोकशाही कुणाची मनमर्जीने (मनतंत्र) चालत नसते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले.

लोकशाहीला मनमर्जीचा धोका
नवी दिल्ली : लोकशाही कुणाची मनमर्जीने (मनतंत्र) चालत नसते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले. संसदेतील कामकाजाचा खोळंबा होत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करतानाच काँग्रेसकडून सुरू असलेल्या विरोधाचा अप्रत्यक्ष संदर्भ दिला.
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहांतील कामकाज ठप्प पाडल्याचा उल्लेख टाळत ते म्हणाले की, लोकशाही ही केवळ निवडणुका आणि सरकारपुरती मर्यादित नसते. लोकशाहीसमोर ‘मनतंत्र’(स्वत:ची मर्जी) आणि ‘धनतंत्र’ (धनशक्ती) हे दोन मुख्य धोके उभे ठाकले आहेत.
संसदेत विधेयके अडवली जात असल्यामुळे गरिबांना त्यांचा हक्क मिळत नाही. केवळ जीएसटीच नव्हे, तर गरिबांना उपयोगी पडणारी अनेक विधेयके अडकून पडली आहेत. हे दु:खदायक आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.