शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

देश-परदेश लालू आंबे

By admin | Updated: June 6, 2015 00:11 IST

लिची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्क

लिची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्क
लालूप्रसाद यादव: झाडे मी लावली होती
पाटणा: बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असणार्‍या झाडांचे फळे कोणी घ्यायची यावरुन जितनराम मांझी आणि नितीशकुमार यांच्यामध्ये चाललेल्या वादात आणखी दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. या बंगल्याच्या बागेतील फळे खाण्याचा पहिला अधिकार माझा व माझी पत्नी राबडीदेवी यांचाच आहे, कारण ती झाडे मी लावली आहेत असे सांगत लालू प्रसाद यादव यांनी या वादामध्ये प्रवेश केला आहे.
लिची और आम के पेड पर मेरा और राबडीका हक है, हमने ही वहाँ पेड लगाये थे, असे सांगत लालू प्रसाद यांनी त्या फळांवर हक्क सांगितला आहे. मुख्यमंत्रीपद गेले तरी मांझी यांनी १, अणे मार्ग हा बंगला सोडलेला नाही. त्यामुळे, या बंगल्याच्या बागेतील झाडांची फळे त्यांना मिळू नयेत यासाठी नितिशकुमार यांनी झाडांची राखण करण्यासाठी पोलीस शिपायांची नेमणूक केली आहे. त्यावरुनच हा वाद सुरु झाला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर बिहारच्या राजकारणात प्रभावी असणारे महादलित कार्ड खेळत नितीशकुमार यांनी मांझी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. पण आधी केवळ प्यादे वाटणारे मांझी नितीशकुमार यांच्यावरच चाल करून गेल्यावर त्यांना हटविण्यात आले. नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले असले तरी जितनराम मांझी व नितिश यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

चौकट:
फळझाडांची मुळे कुठवर?
वरवर बालिश वाटणार्‍या या वादाचा संबंध बिहारच्या आगामी निवडणुकांमुळे तापत चाललेल्या राजकारणाशी आहे. लिची, आंब्याच्या या वादात भाजपानेही प्रवेश केला आहे. भाजपा आणि जितनराम मांझी यांनी नितिशकुमार यांनी आपल्या कृत्यातून महादलितांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. नितीश यांनी मी आवाम(जनता) ची काळजी करतो तर मांझी आम (आंबे)ची काळजी करत बसले आहेत असा टोमणा मारला आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी भाजपाविरोधात लढण्यासाठी शड्डू ठोकले असले तरी त्यांचे खरे मनोमिलन अद्याप झालेले नाही. आता लोहियांचे हे शिष्य फळांसाठी असेच भांडत बसतात का समाजवादी तत्वाला जागून फळे वाटून खातात ते पाहता येईल.