म्हापसा वीज कार्यालयातील महिलांची पाण्यासाठी वणवण
By Admin | Updated: June 10, 2014 01:51 IST2014-06-10T00:55:53+5:302014-06-10T01:51:20+5:30
बार्देस : म्हापसा हाऊसिंगबोर्ड येथील वीज खात्यातील निवासी गाळ्यांमधील १९ कुटुंबियांना गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी त्यांची भटकंती सुरू झाली आहे. याबाबत उत्कर्षा गडेकर, अंजली कौशल, स्वाती कोरगावकर, प्रमिला हरिजन, अनिता खानापूरे यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या आठ-दहा दिवसांपासून नळाद्वारे पाणी वरती येत नाही. त्यामुळे टाकीतील पाणी बादली, कळशीच्या सहाय्याने काढावे लागते.

म्हापसा वीज कार्यालयातील महिलांची पाण्यासाठी वणवण
बार्देस : म्हापसा हाऊसिंगबोर्ड येथील वीज खात्यातील निवासी गाळ्यांमधील १९ कुटुंबियांना गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी त्यांची भटकंती सुरू झाली आहे. याबाबत उत्कर्षा गडेकर, अंजली कौशल, स्वाती कोरगावकर, प्रमिला हरिजन, अनिता खानापूरे यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या आठ-दहा दिवसांपासून नळाद्वारे पाणी वरती येत नाही. त्यामुळे टाकीतील पाणी बादली, कळशीच्या सहाय्याने काढावे लागते.
हा भाग डोंगर भाग असल्याने याठिकाणी विहीरीचीही सोय नाही, त्यामुळे नळाद्वारे येणार्या पाण्यावरच येथील लोकांना अवलंबून राहावे लागते. येथील बंद पडलेले नळ संबंधीत खात्याने पूर्ववत करण्याची मागणीही या कुटूंबीयांनी केली आहे. (प्रतिनिधी)
फोटो : १) पाण्यासाठी उभ्या असलेल्या महिला. २) पाण्याच्या टाकीतून पाणी काढताना एक महिला. (प्रकाश धुमाळ) ०९०६-एमएपी-०५,०६