शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"ईश्वराची इच्छा असेल तर..."; गुरमीत राम रहीमचं तुरूंगातून आई, अनुयायांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 12:05 IST

सोमवारी आयोजित सत्संगमध्ये त्याचं पत्र वाचून दाखवण्यात आलं.

ठळक मुद्देसोमवारी आयोजित सत्संगमध्ये त्याचं पत्र वाचून दाखवण्यात आलं.यापूर्वीही मार्च आणि जुलै महिन्यात त्यानं आपल्या अनुयायांसाठी लिहिलं होतं पत्र

रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यानं आपली आई आणि अनुयायांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यानं लवकरच आपण तुरूंगाबाहेर येऊ अशी अशाही व्यक्त केली आहे. "जर ईश्वराची इच्छा असेल तर आपण लवकरच तुरूंगाबाहेर येऊन आईचे उपचार करू," असंही त्यानं पत्रात नमूद केलंय. सोमवारी डेरामध्ये दुसरे गुरू सतनाम सिंग यांच्या १०२ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गुरमीत राम रहीमचं पत्र वाचून दाखवण्यात आलं. "ईश्वराची इच्छा असेल तर मी लवकरच तुरूंगातून बाहेर येईन आणि आपल्या आईचे उपचार करेन. जेव्हा मी आईला भेटण्यासाठी रुग्णालयात आलो होते तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. परंतु मला भेटल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे," असं गुरमीत राम रहीमनं आपल्या पत्रात म्हटलं आहे. यापूर्वी १३ मार्च २०२० आणि २८ जुलै २०२० रोजी त्यानं आपल्या आईला पत्र लिहिलं होतं. मोठ्या प्रमाणात अनुयायी सहभागीडेरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्संगच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. डेराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही पोलीस तैनात करण्यात आले होते. सत्संगच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच डेरा अनुयायी त्या ठिकाणी पोहोचण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर त्या ठिकाणी डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याचं रेकॉर्डेड सत्संग ऐकवण्यात आलं. त्यानंतर डेरातील सेवकानं गुरमीत राम रहीम यानं आपल्या अनुयायांसाठी आणि आपल्या आईसाठी लिहिलेलं पत्र वाचून दाखवण्यात आलं. "२०२१ हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचं ठरावं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होवो. ईश्वर सर्वांवर आपली कृपादृष्टी ठेवो," असंही त्यानं आपल्या पत्रात लिहिलं होतं. डेरानं दिलेल्या माहितीनुसार हे पत्र त्यानं २३ जानेवारी रोजी लिहिलं होतं. 

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीमDera Saccha Saudaडेरा सच्चा सौदाPoliceपोलिसrohtak-pcरोहतकjailतुरुंग